Accident in Panjim Dainik Gomantak
गोवा

पणजी बसस्थानकाजवळ दुचाकीचा अपघात

दुचाकीस्वार अपघातात जखमी झाल्याची माहिती, उपचार सुरु

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात अपघातांचं सत्र सुरुच आहे. यातच भर म्हणजे पणजी बसस्थानकाजवळ दुचाकीचा अपघात पाहायला मिळाला आहे. मंगळवारी सकाळी अटल सेतूखाली हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पणजीजवळच असलेल्या बांबोळी येथे काल सोमवारी एका कारचा भीषण अपघात झाला होता. अपघातग्रस्त कार महाराष्ट्रातील असून हा स्वयंअपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातात एकजण जखमी झाला असून त्याला जवळच असलेल्या गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. दुभाजकाला धडकल्याने कारचा टायर फुटला. दरम्यान अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरीही चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

दुसरीकडे रविवारी रात्री उशिरा कुचेली म्हापसा येथे प्रवासी रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातामध्ये रिक्षा कलंडल्याने रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कुचेली येथील पुलावर हा प्रवासी रिक्षाचा अपघात झाला आहे. गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पावसामुळे अनेक ठिकाणी अपघात होत असल्याचं दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT