Bike Accident in Gudi Paroda Dainik Gomantak
गोवा

गुडी-पारोडा हमरस्त्यावर दुचाकींचा भीषण अपघात

दोन दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; दुसरा चालक गंभीर अवस्थेत रुग्णालयात

सुशांत कुंकळयेकर

केपे : गुडी पारोडा येथील हमरस्त्यावर आज मंगळवारी 24 मे रोजी सकाळी झालेल्या दोन दुचाकीमध्ये समोरासमोर जोरदार धडक बसल्याने अपघात झाला. या अपघातात अवेडे, केपे येथील प्रकाश नाईक (20) यांचा जागीच मृत्यू झाला तर कावरे येथील देविदास गावकर (32) हा गंभीर जखमी झाले असून त्याला मडगाव येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 7.45 वा. प्रकाश नाईक हा गुडीहून आपल्या घरी निघाला होता तर देविदास गावकर मडगावला जात होता. गुडी पारोडा येथे पेट्रोल पंप जवळ केपे ते मडगावला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दोघांची समोरासमोर जबरदस्त धडक बसल्याने प्रकाश जागीच ठार झाला. अपघातात देविदास गावकर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी मडगाव येथे जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राप्त माहितीनुसार प्रकाश नाईक हा त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याचे बोलले जाते. केपे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून नाईक याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या हमरस्त्यावर अपघात वाढले असून मागच्या तीन महिन्यात याच रस्त्यावरील हा दुसरा अपघाती मृत्यू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT