Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णसंख्येत मोठी वाढ; सक्रीय कोरोनारूग्णांची संख्या 362 वर

जाणून घ्या नवीन कोरोना रूग्णांची संख्या

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Corona Update: गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढ होऊ लागली आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकूण 97 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहेत.

यापैकी 3 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर उर्वरीत 95 बाधितांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.

नव्याने भर पडलेल्या रूग्णसंख्येने राज्यातील सक्रिय कोरोना रूग्णांची संख्या आता 362 वर पोहचली आहे. दिवसेंदिवस रूग्णसंख्येत वेगाने वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाची धास्ती वाढू लागली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांमध्ये एकूण 24 रूग्ण कोरोनामुक्त झाले तर एकूण 971 चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोरोनामुक्तीचा दर 98.32 टक्के इतका आहे.

तर राज्यात आत्तापर्यंत कोरोनामुळे 4013 मृत्यू झाले आहेत. राज्यात एकूण 21 लाख 60 हजार 120 चाचण्या झाल्या आहेत.

तर एकूण 2 लाख 59 हजार 705 रूग्ण आढळून आले होते. त्यापैकी 2 लाख 55 हजार 330 रूग्ण बरे झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: संकष्टी चतुर्थीला जुळून आलाय अत्यंत दुर्मिळ शुभ योग! बाप्पाच्या आशीर्वादाने 'या' 5 राशींचे उघडणार नशिबाचे दरवाजे, नोकरी-व्यवसायात प्रगतीचे संकेत

Monsoon: पावसाळा संपायला अवघे 3 दिवस, तरी राज्यात पावसाची मोठी तूट; यंदा 36.41 इंच पाऊस कमी

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

SCROLL FOR NEXT