Pava Festival Dainik Gomantak
गोवा

Pava Festival: डिचोलीत रंगला सामूहिक 'पवा उत्सव'; महाराष्ट्रातील पथकांनी नोंदवला सहभाग

Goa Dhangar Community: धनगर बांधवांचा एक मोठा आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा सामूहिक 'पवा उत्सव' शनिवारी (2 नोव्हेंबर) डिचोलीतील लाखेरे येथे रंगला.

Manish Jadhav

डिचोली: धनगर बांधवांचा एक मोठा आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा सामूहिक 'पवा उत्सव' शनिवारी (2 नोव्हेंबर) डिचोलीतील लाखेरे येथे रंगला. रात्रभर ढोल वाद्याच्या गजरात गजानृत्य आदी लोकनृत्ये सादर करुन धनगर बांधवांनी लोकसंस्कृतीचा अविष्कार घडवला.

दरम्यान, लाखेरे येथील श्री संत सद्गुरू बाळूमामा मंदिरात लाखेरे ग्रामस्थ मंडळाने या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन केले होते. वेगवेगळ्या भागातून आलेल्या संत श्री सद्गुरू बाळूमामांच्या हजारो भक्तांनी उपस्थित राहून या महोत्सवाचा मनसोक्त आनंद लुटला.

आज (रविवारी) पहाटे सोने लुटणे आदी कार्यक्रम पार पडल्यानंतर या 'पवा' उत्सवाची सांगता झाली. शनिवारी सायंकाळी संत श्री सद्गगुरु बाळूमामांची आरती झाल्यानंतर पारंपरिक विधी झाल्यानंतर 'पवा' उत्सवाचा ढोल वाजला. या सामूहिक उत्सवात गोव्यासह महाराष्ट्रातील पथके सहभागी झाली होती. लाखेरे ग्रामस्थ मंडळाने सादर केलेल्या गजानृत्याने महोत्सवाची सुरवात झाली. विविध भागातून आलेल्या धनगर बांधव पथकांनी रात्रभर गजानृत्य आदी लोकनृत्य प्रकार सादर करुन धनगर समाजाच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी अजूनही दिवाळी बोनसच्या प्रतीक्षेत

'Cash For Job Scam'चे आणखी एक प्रकरण उघड! निवृत्त नौदल कर्मचाऱ्याच्या मुलाकडून 6 लाख उकळले

FC Goa: आज मोठी लढत! एफसी गोवा आणि पंजाब भिडणार

Suchana Seth Case: आरोप निश्चित! पोटच्या मुलाची हत्या करणाऱ्या 'सूचना'विरोधात चालणार खटला

Goa Crime: संशयित कॉन्स्टेबलचा भाऊ अजूनही फरार! दोघी बहिणींना न्यायालयीन कोठडी; 'तो' दुर्दैवी व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT