Advalpal Bicholim: ‘फोमेंतो’वरुन अडवलपाल ग्रामसभेत गदारोळ! ‘एनओसी’मुळे ग्रामस्थ आक्रमक; सभेला सरपंचांची ‘दांडी’

Advalpal Gramsabha: खाणीवरून डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची ग्रामसभा तापली. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘फोमेंतो’ कंपनीला पंचायतीने परस्पर दिलेल्या ना हरकत दाखल्यावरून ग्रामसभेत काहीसा गदारोळ निर्माण झाला.
Advalpal Gramsabha: खाणीवरून डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची ग्रामसभा तापली. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘फोमेंतो’ कंपनीला पंचायतीने परस्पर दिलेल्या ना हरकत दाखल्यावरून ग्रामसभेत काहीसा गदारोळ निर्माण झाला.
Advalpal PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

Advalpal Bicholim Villagers Protest Panchayat's Decision to Allow Fomento Mining

डिचोली: खाणीवरून डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची ग्रामसभा तापली. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘फोमेंतो’ कंपनीला पंचायतीने परस्पर दिलेल्या ना हरकत दाखल्यावरून ग्रामसभेत काहीसा गदारोळ निर्माण झाला. फोमेंतो कंपनीला दिलेली ‘एनओसी’ मागे घ्या अशी मागणी ग्रामस्थांनी करून तसा ठराव घेतला.

पंचायतीची परवानगी मिळवण्यासाठी खाण कंपनीने तयार केलेला ‘ईआयए’ अहवाल दिशाभूल करणारा आहे. या आरोपाचा ग्रामस्थांनी आजच्या ग्रामसभेत पुनःरुच्चार केला. आजच्या ग्रामसभेला सरपंच अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. लोकांचा विरोध असतानाही खाण व्यवसाय सुरू करण्यास पंचायत मंडळाने संबंधित खाण कंपनीला ‘ना हरकत दाखला’ दिला आहे. मागील ग्रामसभेप्रमाणे आजच्या ग्रामसभेतही उपस्थित ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त करून पंचायतीच्या या कृतीला आक्षेप घेतला.

सरपंच गजानन पालकर यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच विनश्री गावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली. या ग्रामसभेस अन्य पंच सदस्य उपस्थित होते. उपसरपंच विनश्री गावकर यांनी स्वागत केल्यानंतर पंचायत सचिवांनी मागील ग्रामसभेचे इतिवृत्त सादर केले.

Advalpal Gramsabha: खाणीवरून डिचोलीतील अडवलपाल पंचायतीची आजची ग्रामसभा तापली. खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी ‘फोमेंतो’ कंपनीला पंचायतीने परस्पर दिलेल्या ना हरकत दाखल्यावरून ग्रामसभेत काहीसा गदारोळ निर्माण झाला.
Goa Crime: गोव्यात फसवणुकींचे सत्र सुरूच! 55 लाख उकळले; फोंडा पोलिसांकडून दोघांना अटक

‘एनओसी’ला आक्षेप

खाण व्यावसायामुळे गावातील नैसर्गिक जलस्रोत आधीच नामशेष झाली आहेत. खाण माती घुसून शेती, बागायती धोक्यात आली आहे. खाणबंदीपूर्वी गावात सुरू असलेल्या खाण व्यवसायामुळे गावातील जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. शेती-बागायती व्यवसायापासून वंचित व्हावे लागले आहे ही वस्तुस्थिती आहे. गावाच्या भवितव्याचा विचार करून आणि गावातील समस्या सोडवून नंतरच गावात खाण व्यवसाय सुरू करण्याचा विचार व्हावा, असे सांगून आजच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी ‘एनओसी’ला आक्षेप घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com