Shiroda water pipeline repair Dainik Gomantak
गोवा

Bicholim Water Issue: वणवण संपली! साडेतीन दिवसांनंतर डिचोलीत पाणी; गृहिणींचा जीव भांड्यात

Goa Water Crisis: पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बहुतेक भागांतील गृहिणींसह पुरुषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: तब्बल साडेतीन दिवसांनंतर डिचोलीतील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. नळ घसघसू लागल्याने पाणी समस्येने त्रस्त बनलेल्या गृहिणींचा जीव अखेर भांड्यात पडला आहे. सोमवारी (ता.१०) सायं. ४ वाजण्याच्या सुमारास डिचोलीसह मये भागात पाणीपुरवठा सुरळीत झाला.

मयेतील मिळून ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण झाली होती. सोमवारी दुपारपर्यंत नळ कोरडे राहिल्याने डिचोलीसह मये भागातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी मारामारी सहन करावी लागली. साडेतीन दिवसांपासून नळांना पाणी नसल्याने विशेषकरून गृहिणींचे हाल झाले होते.

डिचोली शहरातील नाईकनगर-बोर्डे येथील सर्व्हे क्र.-१४९/२ या जमिनीतून गेलेली ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी स्थलांतरित करण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी असे दोन दिवस डिचोलीसह मये भागात मर्यादित पाणीपुरवठा करण्यात येईल, असे ‘पीडबल्यूडी’ने जाहीर केले होते.

मात्र, दोन दिवस उलटल्यानंतर रविवारी नळांना पाणी येणार, अशी अपेक्षा होती. गृहिणी तर पाणी कधी येणार, त्याची डोळे लावून वाट पाहत होत्या. मात्र, बहुतेक भागातील गृहिणींची घोर निराशा झाली. रविवारी रात्री उशिरापर्यंत नळ कोरडे राहिले होते.

पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या बहुतेक भागांतील गृहिणींसह पुरुषांनाही पाण्यासाठी वणवण करावी लागली होती. सर्वजण पाण्यासाठी धावपळ करताना दिसून येत होते. सोमवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर संबंधित खात्याच्या कार्यालयावर मोर्चा नेण्यात येईल, असा इशाराही संतप्त गृहिणींनी दिला होता.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी रविवारी रात्री उशिरापर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. सायंकाळी उशिरा नळांतून कमी दाबाचा पाणीपुरवठा सुरू झाला होता. सोमवारी सकाळपर्यंत डिचोलीसह मये भागात पाणीपुरवठा पूर्वपदावर येईल, असा विश्वास ‘पीडब्ल्यूडी’च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. मात्र, अखेर सोमवारी सायंकाळी पाणीपुरवठा सुरळीत झाला.

जलवाहिनीचे काम लांबले

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. मात्र, उच्च दाब निर्माण होऊन जलवाहिनीची जोडणी सुटली. त्यामुळे जलवाहिनीची नव्याने दुरुस्ती करावी लागली. त्यामुळेच जाहीर केल्याप्रमाणे पाणीपुरवठा सुरळीत करणे ‘पीडब्ल्यूडी’ला शक्य झाले नाही. आता नळातून पाणी घसघसून वाहू लागल्याने पाण्यासाठी वणवण केलेल्या गृहिणींसह पुरुषांची त्रासातून सुटका झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT