Goa Mining Issue Dainik Gomantak
गोवा

Bicholim Mining: खनिज वाहतुकीसाठी बाहेरील ट्रक नकोच! आमदारांच्या बैठकीत तापले वातावरण, स्थानिकांनी मांडले गाऱ्हाणे

Goa Mining: खनिज वाहतुकीच्या प्रश्नावरून डिचोलीत पुन्हा एकदा गुंता निर्माण झाला असून बाहेरील कंत्राटी ट्रकांना स्थानिक ट्रकमालकांनी विरोध केला आहे.

Sameer Panditrao

Goa Mineral Transportation Issue

डिचोली: खनिज वाहतुकीच्या प्रश्नावरून डिचोलीत पुन्हा एकदा गुंता निर्माण झाला असून बाहेरील कंत्राटी ट्रकांना स्थानिक ट्रकमालकांनी विरोध केला आहे. दरम्यान, खाणीशी संबंधीत प्रश्न जाग्यावर घालण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, असे वेदांता कंपनी व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

खनिज वाहतूकप्रश्नी आज (मंगळवारी) सायंकाळी आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट यांच्याबरोबर डिचोली ट्रकमालक संघटनेची एक बैठक झाल्याची माहिती मिळाली आहे. ट्रकमालकांच्या आक्रमक भूमिकेमुळे बैठकीतील वातावरण काहीसे तापल्याची माहिती मिळाली आहे.

खनिज वाहतुकीसाठी बाहेरील ट्रक नकोच अशी भूमिका या बैठकीत ट्रकवाल्यांनी मांडली आहे. याप्रश्नी तोडगा काढण्याची ग्वाही आमदारांनी ट्रकवाल्यांना दिल्याची माहिती मिळाली आहे. याप्रश्नी कंपनी व्यवस्थापन आता कोणता निर्णय घेते, त्याकडे स्थानिक ट्रकवाल्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

खनिज वाहतूक बंद

खनिज वाहतुकीसाठी बाहेरील दहाचाकी ट्रकांना कंत्राट दिल्याने स्थानिक ट्रकमालक अस्वस्थ बनले आहेत. कालपासून वेदांताच्या खाणीवरील खनिज वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.

प्रश्न मार्गी लावणार

डिचोली खाण ब्लॉक-१ अंतर्गतच्या खाणीशी निगडीत असलेल्या घटकांचे प्राधान्याने आर्थिक हित जपण्यासाठी कंपनी बांधील आहे, असे ‘वेदांता’ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे. कामगार आणि अन्य संबंधीत मिळून ९०० हून अधिकजण आणि दीडशेहून अधिक ट्रक खाणीवर अवलंबून आहेत. खनिज वाहतूक आणि अन्य खाणीशी निगडीत प्रश्न संबंधितांना विश्वासात घेऊन मार्गी लावणार, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT