Bicholim Crocodile Hatchling Dainik Gomantak
गोवा

Bicholim Crocodile Hatchling: व्हाळशी तळ्यामधील पिंजऱ्यात अडकले आणखी मगरीचे पिल्लू, एक मगर अजूनही तळ्यात; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Valshi Pond Crocodile: डिचोली शहरातील व्हाळशी येथील तळ्यात दहशत घातलेल्या मगरींपैकी आणखी एक मगरीचे ‘पिल्लू’ सापळ्यात (पिंजरा) अडकले.

दैनिक गोमन्तक डिजिटल

डिचोली: डिचोली शहरातील व्हाळशी येथील तळ्यात दहशत घातलेल्या मगरींपैकी आणखी एक मगरीचे ‘पिल्लू’ सापळ्यात (पिंजरा) अडकले. वन खात्याने तळ्यात लावलेल्या सापळ्यात (पिंजरा) मगरीचे हे पिल्लू अडकल्याचे शुक्रवारी पहाटे स्थानिकांच्या निदर्शनास आले.

मगरीचे हे पिल्लू साधारण दीड फूट लांबीचे आहे. या पिल्लाची बोंडला अभयारण्यात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, दोन दिवसांच्या आत तळ्यात मगरीची दोन पिल्ले पकडण्यात आल्याने स्थानिक लोकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

तरी या तळ्यात मगरींच्या आईसह आणखी दोन ते तीन मगरीची पिल्ले असल्याचा दावा काही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे लोकांमध्ये निर्माण झालेली भीती अजूनही कायम आहे. तळ्यात आणखी मगरी असल्याने तळ्यात लावलेला सापळा तसाच ठेवण्यात आला आहे. या तळ्यातील तळे मगरींपासून कधी मुक्ती मिळते त्याची व्हाळशीवासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

दोन्ही मगरींची रवानगी बोंडलात

दोन दिवसांपूर्वी या तळ्यातील एक मगर सापळ्यात अडकली होती. बुधवारी पहाटे ही मगर पिंजऱ्यात अडकल्याचे दिसून आले होते. त्यानंतर वन खात्याच्या पथकाने या मगरीला ताब्यात घेऊन तीची बोंडला येथे रवानगी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT