Goa Agriculture Dainik Gomantak
गोवा

Goa Agriculture: डिचोलीत परतीच्या पावसाचा भातशेतीला फटका! मयेतील भातपीक आडवे, बळीराजा चिंतेत

Bicholim Paddy Crop Damage: विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी झालेल्या परतीच्या पावसाने डिचोली तालुक्यातील अनेक भागांना झोडपले.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी सायंकाळी झालेल्या परतीच्या पावसाने डिचोली तालुक्यातील अनेक भागांना झोडपले. मयेसह काही भागांत भातपीक कापणीची लगबग सुरू असतानाच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.

मयेतील मुळाक खाजन शेतीतील काही भातपीक आडवे झाले असून, पाऊस सुरूच राहिल्यास हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात पाऊस पडत असला, तरी त्याचा विशेष परिणाम जाणवला नव्हता. मात्र, शुक्रवारी दुपारनंतर अनेक भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे कापणीच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

मये भागात शनिवारपासून यंत्रांद्वारे भातकापणी करण्याची तयारी केली होती. मात्र, त्याआधीच पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी संकटात आले आहेत. पावसाने जर आताच माघार घेतली नाही, तर यंदा नैसर्गिक आपत्तीचे संकट ठरलेले आहे. तसे झाले तर यंदा भातपीक पूर्णपणे नष्ट होऊन शेतकऱ्यांना प्रचंड नुकसानी सोसावी लागणार आहे. - विश्वास चोडणकर, शेतकरी, मये

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Unseasonal Rain: गोव्यात अवकाळीचा तडाखा! सत्तरीत घरावर झाड कोसळले; 40 सुपारी आणि 60 केळीची झाडे मोडली

Goa Traffic Management: पणजीला स्मार्ट सिटीचा दर्जा, पण पार्किंगचा पत्ता नाही! वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बहुमजली वाहनतळ हवाच

Inflation Hike 2026: साबण, चॉकलेटपासून मोबाईल रिचार्जपर्यंत... सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री; कच्चा माल महागल्याने महागाईचा उडणार भडका

Sameera Reddy Goa House: 4,000 स्क्वेअर फूटमध्ये सुंदर आशियाना, भोवताली हिरवळच हिरवळ; समीरा रेड्डीच्या गोव्यातील आलिशान घराची खास झलक VIDEO

8th Pay Commission Updates: फिटमेंट फॅक्टर आणि महागाई भत्त्याचे गणित बदलणार? मुंबईतील बैठकीनंतर मोठे संकेत; पगारवाढीचा नवा फॉर्म्युला ठरणार?

SCROLL FOR NEXT