Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim: डिचोलीतील 'त्या' गाड्यांवरील संकट तूर्त टळले, स्थलांतराचा मुद्दा ऐरणीवर; कारवाई चतुर्थीनंतर होण्याची शक्यता

Bicholim Vehicle Relocation Issue: डिचोली येथील बाजारातील ‘त्या’ जीन्याखालील स्टॉलवजा दुकानांवरील संकट तूर्त टळले असून, ही गाडे हटविण्याची मोहीम लांबणीवर पडली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: येथील बाजारातील ‘त्या’ जीन्याखालील स्टॉलवजा दुकानांवरील संकट तूर्त टळले असून, ही गाडे हटविण्याची मोहीम लांबणीवर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित स्टॉलवजा दुकानांचे स्थलांतर करण्याबाबत तोडगा न निघाल्याने गाडे हटविण्याची कारवाई पालिकेने तूर्त स्थगित ठेवली असल्याचे समजते.

सध्या कारवाई टळली असली, तरी चतुर्थीनंतर ही दुकाने हटविण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने बाजारातील मोडकळीस आलेल्या जीन्याखालील स्टॉलवजा दुकाने हटविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. गेल्या शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी पालिकेने मोहीम हाती घेत गाडे खाली करण्याचे आदेश संबंधित गाडेधारकांना दिल्यानंतर त्यांच्यावर संकट कोसळले होते. कारवाईच्या भीतीने दोन-तीन गाडेधारकांनी आपले साहित्य बाहेर काढले. मात्र, स्थलांतराचा प्रश्न निर्माण झाल्याने ही कारवाई थंडावली आहे.

दरम्यान, कारवाईच्या भीतीने सोमवारी पाच दुकाने बंदच होती. बाजारातील जीर्ण जीन्याखाली स्टॉलसह एकूण नऊ गाडे आहेत. काही गाड्यांना वीजजोडणी देण्यात आली आहे. ही सर्व गाडे हटविण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

कारवाईच्या भीतीने सोमवारी पाच दुकाने बंद

शुक्रवारी सायंकाळी पालिकेच्या आदेशानुसार तीन स्टॉलधारकांनी आपले साहित्य स्टॉलमधून बाहेर काढून पालिकेच्या सूचनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडपात स्थलांतरित केले. मात्र, त्या मंडपात स्टॉल उभारण्यास गणेशोत्सव मंडळाने हरकत घेतली.

भर पावसात सुरक्षित जागा नसल्याने संबंधित गाडेधारकांनी साहित्य पुन्हा जीन्याखाली आणून ठेवले. दोन दिवस सुटी असल्याने सोमवारी गाडे हटविण्याची मोहीम पुन्हा हाती घेतली जाईल, असा अंदाज होता. मात्र, आता ही मोहीम चतुर्थीपर्यंत तरी लांबणीवर पडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT