Sateri Devi Kalotsav Dainik Gomantak
गोवा

Goa Devi Festival: सातेरी देवीच्या कालोत्सवात 'गोबी मंच्युरीयन'ला पुर्णपणे प्रतिबंधक

Goa Devi Festival: वन-सातेरी देवीच्या कालोत्सवात 'गोबी मंच्युरीयन'चे स्टॉल नाहीत.

दैनिक गोमन्तक

Bicholim: आरोग्याला घातक असलेल्या 'गोबी मंच्युरीयन'ला डिचोलीतील बहुतेक भागातून विरोध होऊ लागला आहे. काल साजरा झालेल्या डिचोलीतील वन या गावातील कालोत्सवाच्या फेरीत ‘गोबी मंच्यूरीयन’चे स्टॉल थाटण्यास देवस्थान समितीने प्रतिबंध केल्याने वन गावात यंदा हे स्टॉल दिसून आले नाहीत.

देवस्थान समितीने घेतलेल्या निर्णयामुळे ‘गोबी मंच्यूरीयन’चे स्टॉल थाटण्याचा संबंधित परप्रांतीय व्यावसायिकांचा प्रयत्न फसला. आणि स्टॉल थाटण्यासाठी आलेल्या व्यावसायिकांना माघारी फिरावे लागले. देवस्थान समितीच्या या निर्णयाचे गावातूनही स्वागत करण्यात आले.

जत्रा किंवा कालोत्सवानिमित्त विविध गावात भरणाऱ्या फेरीत गेल्या काही वर्षांपासून बहूतेक भागात परप्रांतीय व्यावसायिकांकडून गोबी मंच्यूरीयनचे स्टॉल थाटण्यात येत आहेत. अलीकडच्या काही वर्षात तर त्यांचे प्रस्थ वाढले आहे. मात्र या व्यावसायिकांकडून कोणतीच स्वच्छता पाळण्यात येत नाही.

त्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या 'गोबी मंच्यूरीयन'च्या स्टॉलना काही भागातून आता विरोधही होऊ लागला आहे. यंदा डिचोलीतील प्रसिद्ध 'नवा सोमवार' लाडफे येथील कालोत्सवाच्या फेरीतही या स्टॉलना प्रतिबंध करण्यात आला होता. यंदा कालोत्सवाच्या फेरीत थारा द्यायचा नाही, असा निर्णय वन येथील श्री सातेरी देवस्थान समितीने घेतला.

तसेच, त्यामुळे यंदा वन येथे 'गोबी मंच्युरीयन' व्यावसायिकांना स्टॉल थाटून व्यवसाय करता आला नाही. कालोत्सवानिमित्त 'गोबी मंच्युरीयन'चे काही व्यावसायिक वन येथे आले होते. मात्र स्टॉल थाटण्यास हरकत घेतल्याने ते माघारी परतले.

गावागावात विरोध व्हावा !

‘गोबी मंच्युरीयन’ हा खाद्यपदार्थ आरोग्यास हानीकारक आहेच. उलट त्यामुळे अस्वच्छताही निर्माण होत असते. त्यामुळेच या स्टॉलना प्रतिबंध करण्यात आला, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष नागेश गावकर यांनी दिली. गावागावातून ‘गोबी मंच्युरीयन’ला विरोध व्हायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भेटींचा उत्सव, मतांचा ध्यास! गणेश चतुर्थीत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींना उधाण; दर्शनासोबत निवडणुकीच्या समीकरणांचीही चर्चा

America Iran War: 6 महिन्यांत 3.21 लाख कोटींची राखरांगोळी, फायटर जेट्स उद्ध्वस्त, अमेरिकन दूतावासांवर हल्ले; पेंटागनच्या ऑडिट रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

SCROLL FOR NEXT