डिचोली: भाडेकरू पडताळणी मोहिमेला डिचोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, संबंधीत अर्ज भरून देण्यासाठी दरदिवशी पोलिस स्थानकात गर्दी करीत आहेत. राज्यात वाढणाऱ्या चोऱ्या आदी गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सरकारने भाडेकरू पडताळणी मोहीम सक्तीची केली आहे. त्यामुळे इतर भागाप्रमाणेच डिचोलीतही या मोहिमेला प्रतिसाद मिळत आहे.
घरमालकांना भाडेकरुंची तसेच बांधकामस्थळी राहणाऱ्या मजूरांविषयी कंत्राटदारांना पडताळणी अर्ज भरून माहिती सादर करणे बंधनकारक आहे.
भाडेकरू आणि मजुरांविषयी माहिती देण्याचे घरमालक किंवा कंत्राटदारांनी टाळले, तर संबंधीतांविरोधात कारवाई अटळ आहे. वैयक्तिक १० हजार रुपयेपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे. त्यामुळेच आवश्यक कागदपत्रांसह पडताळणी अर्ज भरून देण्यासाठी संबंधितांची सध्या पोलिस स्थानकात गर्दी होत आहे.
गेल्या १ ऑक्टोबरपरपासून सुरु झालेली ही मोहीम १० ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. भाडेकरू आणि मजूर मिळून शनिवारपर्यंत (ता. ५) दीड हजाराहून अधिक जणांनी केले अर्ज सादर केले आहेत. अशी माहिती मिळाली आहे.
डिचोलीत भाडेकरुंची संख्या मोठी असून, नेमका आकडा उपलब्ध झालेला नाही. मात्र शहरासह डिचोली पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात जवळपास चार ते पाच हजार भाडेकरू राहतात, असा अंदाज आहे. या सर्वांची तपासणी करण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.