Bicholim Police Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: खळबळजनक! कालव्यात सापडल्या मद्याच्या 46 बाटल्या; डिचोली पोलिसांच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

Bicholim Police: कालव्यात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या व्हिस्कीच्या ४६ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करुन दारूच्या या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या व्हिस्कीची बाजारातील किंमत ३० हजार रुपये एवढी असल्याची माहिती मिळाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Liquor Smuggling Racket Busted in Dodamarg Canal by Bicholim Police

डिचोली: डिचोली पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत कालव्यात दडवून ठेवलेल्या व्हिस्कीच्या ४६ बाटल्या जप्त केल्या. महाराष्ट्राच्या सीमेलगत दोडामार्ग येथे आज (शुक्रवारी) ही कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या सीमेलगत पोलिस सतर्क झाले असून, सीमा भागात पोलिसांची दिवसरात्र गस्त सुरू आहे. आज सकाळी गस्तीवेळी दोडामार्ग येथील कालव्यात दारूच्या बाटल्या दडवून ठेवल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले.

कालव्यात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या व्हिस्कीच्या ४६ बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करुन दारूच्या या बाटल्या जप्त केल्या. जप्त केलेल्या व्हिस्कीची बाजारातील किंमत ३० हजार रुपये एवढी असल्याची माहिती मिळाली आहे.

डिचोलीचे पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण घाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. ही दारू कोणी दडवून ठेवली. त्याचा पोलिस शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT