Bicholim pipe line burst Danik Gomantak
गोवा

डिचोलीत जलवाहिनीला भगदाड, पाण्याची नासाडी

दुरुस्ती करण्याकडे साफ दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

डिचोली : एका बाजूने डिचोलीतील काही भागात पाण्याची समस्या असताना, दुसऱ्या बाजूने मात्र चक्क शहरात प्रचंड प्रमाणात पाण्याची नासाडी सुरू आहे. राज्य महामार्गाअंतर्गत येणाऱ्या बगलमार्गावर नाईकनगर-बोर्डे परिसरात मोठी जलवाहिनी फुटून प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपयव्य होतोय. ही जलवाहिनी नेमकी कधी फुटली, त्याची निश्चित माहिती मिळाली नसली तरी किमान पंधरा दिवस उलटून गेल्याची खात्रीलायक माहिती आहे. (Bicholim pipe line burst)

नाईकनगर भागातील एका नागरिकाने या माहितीस दुजोरा दिला. बगलमार्गावर बांधकाम चालू असलेल्या छोट्या पुलाजवळून गेल्या महिन्यापासून पाणी वाहत आहे, असे त्यांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार या जलवाहिनीतून पडोसे जलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे अस्नोडा प्रकल्पात पाणी पुरवण्यात येत आहे.

नाईकनगर-बोर्डे परिसरात बगलमार्गावर बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळून गेलेल्या मोठ्या जलवाहिनीच्या जॉईंटमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत आहे. त्यामुळे दरदिवशी हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीत बिघाड नेमका कसा झाला, ते समजू शकले नसले तरी पुलाचे काम करताना जलवाहिनीचा जॉईंट सुटला असावा असा अंदाज आहे.

दुरुस्ती करण्याकडे साफ दुर्लक्ष

ज्या ठिकाणी जलवाहिनीत बिघाड झाला आहे, त्या ठिकाणी सहजासहजी कोणी फिरकत नाही. त्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात येत नसावा असे गृहीत धरले, तर पुलाचे बांधकाम करणारे कामगार आणि कंत्राटदार यांचा त्या ठिकाणी वावर असतोच. मात्र अद्यापही या जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकडे लक्ष गेलेले नाही. उलट बाहेर वाहणाऱ्या पाण्यासाठी वाट करून दिल्याचे दिसून आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT