Bicholim Bus Stand  Dainik Gomantak
गोवा

23 वर्षांचे ऐतिहासिक कदंब बसस्थानक होणार जमीनदोस्त

काही महिन्यांपूर्वी बसस्थानकाचे कोसळले होते छप्पर; 17 कोटी रुपये खर्च अपेक्षित

दैनिक गोमन्तक

डिचोली : सुमारे 23 वर्षांचा इतिहास असलेले आणि शहराची साक्ष देणारे डिचोलीतील कदंब बसस्थानक अखेर जमीनदोस्त होत आहे. जेसीबी यंत्राद्वारे हे बसस्थानक मोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून, बुधवारी 11 मे रोजी सायंकाळपर्यंत या बसस्थानकाचा अर्धाअधिक भाग पाडण्यात आला आहे.

तत्कालीन आमदार आणि वाहतूक मंत्री पांडुरंग राऊत यांच्या कार्यकाळात हे बस स्थानक बांधण्यात आले होते. 2 ऑक्टोबर 1999 या दिवशी या बसस्थानकाचे लोकार्पण झाले होते. तत्पूर्वी, शहरातील शिवाजी महाराज मैदानाजवळ बसस्थानक होते. मध्यंतरी सध्याच्या बसस्थानकाच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने ते कमकुवत बनले होते. तीन वर्षांपूर्वी बसस्थानकाच्या छपराचे कप्पे कोसळून एक गरोदर महिला जखमी झाली होती. तेव्हापासून हे बसस्थानक चर्चेत आले होते.

जुने बसस्थानक पाडून त्या ठिकाणी आता नवीन बसस्थानक अस्तित्वात येणार आहे. 17 कोटी खर्चून गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे (सुडा) नवीन अत्याधुनिक बसस्थानक बांधण्यात येणार आहे. नवीन बसस्थानक पूर्ण होईपर्यंत तरी मोडण्यात येत असलेल्या बसस्थानकाच्या केवळ आठवणी स्मरणात राहणार आहेत.

डिचोली हे मध्यवर्ती व महत्त्वाचे शहर असल्याने ग्रामीण भागातील लोक अनेक कामांसाठी शहरात येत असतात. ग्रामीण भागातील लोकांना डिचोलीतील बसस्थानक वरदान ठरत असल्याने या बसस्थानकाचा फायदा होत होता. नव्याने उभारण्यात येत असलेल्या अत्याधुनिक बसस्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

SCROLL FOR NEXT