Bicholim Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Bicholim: सहा कोटींच्या थकबाकीची वसुली कधी? डिचोली पालिका बैठकीत मुद्दा ऐरणीवर; घरपट्टी महसूलही थकीत

Bicholim Municipal Council: सरकारी कार्यालयांचे थकीत भाडे, दुकाने आणि घरपट्टी मिळून पालिकेचा जवळपास सहा कोटी रुपयांचा महसूल थकीत असून, या थकबाकीबद्दल आजच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Municipal Council Pending Dues

डिचोली: थकबाकी वसुली आणि स्वच्छता कामगारांच्या विषयावरून डिचोली पालिका मंडळाची आजची बैठक गाजली. सरकारी कार्यालयांचे थकीत भाडे, दुकाने आणि घरपट्टी मिळून पालिकेचा जवळपास सहा कोटी रुपयांचा महसूल थकीत असून, या थकबाकीबद्दल आजच्या बैठकीत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

मुख्याधिकारी सचिन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२९) पालिका मंडळाची बैठक पार पडली. नगराध्यक्ष फळारी यांनी स्वागत केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी ३.३० वाजे पर्यंत चालली. या बैठकीस उपनगराध्यक्ष दीपा पळ यांच्यासह सुखदा तेली, राजाराम परब, विजयकुमार नाटेकर, रियाज बेग, सुदन गोवेकर, अनिकेत चणेकर, नीलेश टोपले, गुंजन कोरगावकर, तनुजा गावकर, ॲड. अपर्णा फोगेरी, ॲड. रंजना वायंगणकर आणि दीपा शिरगावकर हे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

सफाई कामगारांची मनमानी

पालिकेच्या सफाई कामगारांचा विषयही बैठकीत आला. काही कामगार मनमानी करतात, असा आरोप करून त्यांना सक्त ताकीद द्यावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. बांधकामांना ‘ऑक्यूपन्सी’ दाखला देण्यापूर्वी नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी नगरसेविका ॲड. अपर्णा फोगेरी यांनी केली. लाखेरे येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी,अशी मागणी नगरसेवक नीलेश टोपले यांनी केली. कचऱ्याची विल्हेवाटीसाठी नवीन यंत्र खरेदी करणे आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.

वसुलीसाठी नियोजन

सरकारी कार्यालयांचे भाडे तसेच दुकाने, आस्थापने आणि घरपट्टी मिळून पालिकेचा सुमारे ६ कोटींचा महसूल थकीत आहे. वर्षांपूर्वी ही थकबाकी वसूल करण्याची मोहीम सुरू केली होती. मात्र, ती अपयशी ठरली आहे. थकबाकी अजून वसूल का होत नाही? असा प्रश्न नगरसेवक सुदन गोवेकर यांनी बैठकीत केला. वसुलीची मागणी त्यांनी करताच,इतरांनीही पाठिंबा दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT