PirachiKond Slum Demolition  Dainik Gomantak
गोवा

Bicholim PirachiKond: अखेर ‘पिराचीकोंड’ झोपडपट्टी जमीनदोस्त! पोलिस फौजफाट्याच्या उपस्थितीत कारवाई

PirachiKond Slum: चौदा वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन वाद सुरू असलेल्या शहरातील ‘पिराचीकोंड’ येथील बेकायदा झोपडपट्टीवर अखेर कारवाई करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Slum Huts Demolition At Bicholim PirachiKond

डिचोली: मागील जवळपास चौदा वर्षांहून अधिक काळ न्यायालयीन वाद सुरू असलेल्या शहरातील ‘पिराचीकोंड’ येथील बेकायदा झोपडपट्टीवर अखेर कारवाई करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डिचोली पालिकेतर्फे कारवाई करताना ही वादग्रस्त झोपडपट्टी जमीनदोस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. उद्यापर्यंत झोपड्या मोडण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने झोपडपट्टीविरोधात ही कारवाई केली. जेसीबी यंत्राच्या सहकार्याने झोपडपट्टी मोडण्यात आली. बेकायदेशीरपणे उभारलेल्या दहा झोपड्या मोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

दरम्यान, जेसीबीसह पालिकेचे कर्मचारी झोपडपट्टी मोडण्यासाठी ‘पिराचीकोंड’ येथील झोपडपट्टीजवळ येताच झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये खळबळ माजली. बराचवेळ पिराचीकोंड येथे वातावरणही तप्त झाले होते. जमीनमालक आणि झोपडपट्टीवासीयांमधील दोन गटात वादही होताना एका युवकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण आणले. मामलेदार प्रवीण गावस यांनी झोपडपट्टीवासीयांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर जवळपास दोन तासांनंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास झोपडपट्टी मोडण्याची कारवाई हाती घेण्यात आली. पालिकेच्या कामगारांनी झोपड्यांमधील साहित्य बाहेर काढल्यानंतर झोपड्या जमीनदोस्त करण्यास सुरवात झाली.

उपलब्ध माहितीनुसार, २०१० मध्ये मुख्य रस्त्याला लागून असलेली ही झोपडपट्टी मोडण्याचे आदेश पालिका प्रशासन खात्याने दिले होते. मात्र, या निर्णयाला झोपडपट्टीवासीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तेव्हापासून हा वाद न्यायप्रविष्ट होता.

झोपडपट्टीवासीयांचा विरोध

१) ‘पिराचीकोंड’ येथील बेकायदा झोपडपट्टी मोडण्याचे आदेश न्यायालयाने देताच शुक्रवारी सकाळी जेसीबी यंत्रासह पालिकेची यंत्रणा तेथे दाखल झाली. मात्र, झोपडपट्टीवासीयांनी झोपड्या खाली करण्यास नकार दिला. झोपड्या खाली करण्यासंबंधी आम्हाला आगाऊ कल्पना दिली नसल्याचे संबंधितांचे म्हणणे होते.

२) तर झोपडपट्टी मोडण्यात येणार असल्याची नोटिसीद्वारे कल्पना देऊन झोपड्या खाली करण्यास संबंधित झोपडपट्टीवासीयांना आगाऊ कळविले होते, असा पालिकेचा दावा होता. झोपडपट्टी मोडण्यावरून बराचवेळ पिराचीकोंड येथे वादविवाद सुरू होते.

मामलेदारांच्या देखरेखीसह पोलिस फौजफाटा

१) झोपडपट्टीविरोधात कारवाई करताना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पिराचीकोंड येथे मोठा पोलिस फौजफाटा तैनात केला होता. कारवाईवेळी डिचोली पालिकेचे अधिकारी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस एकंदरीत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

२) मामलेदार गावस यांनी झोपडपट्टीवासीयांची समजूत काढून झोपड्या खाली करण्याचे आदेश त्यांना दिले. मात्र, झोपड्या खाली करण्यास कोणीच तयार नव्हते. जवळपास दोन तास प्रतीक्षा करूनही झोपडपट्टीवासीयांनी प्रतिसाद दिला नाही. अखेर दुपारी झोपडपट्टीविरोधात कारवाई करण्याचे आदेश मामलेदारांनी संबंधित यंत्रणेला दिले व कारवाई सुरू झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mayde Gram Panchayat Waste Management: मयडे ग्रामपंचायतीतर्फे विद्यमान कचरा व्यवस्थापन प्रणालीच कायम ठेवण्याचा ठराव मंजूर

Exam System Decentralization: शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर खरी परीक्षा सुरू

VIDEO: तरुणीला मागे बसवून झिगझॅग स्टाइलमध्ये चालवली बाइक; धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल, नेटकऱ्यांकडून कारवाईची मागणी

Gen Z Jantar Mantar Protest: ताठर सरकार अन्‌ युवकांचा निर्धार

Mirabai Chanu Weightlifting Gold Medal: मीराबाई चानूची सुवर्ण हॅट्ट्रिक; CWG 2026 मध्ये भारताला मिळवून दिलं पहिलं 'गोल्ड मेडल' VIDEO

SCROLL FOR NEXT