Birthday Of Almond Tree Dainik Gomantak
गोवा

Birthday Of Almond Tree : डिचोलीत 'बदामा' च्या झाडाचा 'बर्थ डे'

पर्यावरण संवर्धनाचा संदेश : आमदार शेट्ये यांनी कापला केक

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim : पर्यावरण जतनाचा संदेश देत गेल्या सहा वर्षांपासून चक्क ''बदामा''च्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. येथील बसस्थानकाबाहेर मोकळ्या जागेत सहा वर्षांपूर्वी पालिकेने लावलेले ''बदामा''चे झाड आता सहा वर्षांचे झाले आहे.

विद्यार्थी आणि पर्यावरणमोगीच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) या झाडाचा सहावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते केक कापून `बदामा'चा वाढदिवस साजरा करण्यात आला.

मुलाप्रमाणे काळजी घ्या

जागतिक पातळीवर होणारी तापमानवाढ लक्षात घेता, झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे. ही काळाची गरज आहे. प्रत्येकांनी झाडांची मुलांप्रमाणे काळजी घ्यावी. असे आवाहन आमदार डॉ. शेट्ये यांनी करुन झाडाचा वाढदिवस साजरा करण्याच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेचे त्यांनी कौतुक केले. कुंदन फळारी, सचिन देसाई आणि अॅड. अपर्णा फोगेरी यांनी यावेळी झाडांचे महत्व विषद करून, वाढदिवस उपक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

झाडाचा हा वाढदिवस कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या वाढदिवसा प्रमाणे साजरा करण्यात आला. वाढदिवस सोहळ्यात नागरिक उत्साहात सहभागी झाले होते. बदामाच्या झाडांची काळजी घेणाऱ्या तेथील दुकानदारांचा यावेळी आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या झाडाच्या वाढदिवसानिमित्त आयोजकांतर्फे मुलांना फुलझाडांची रोपटी तसेच शालेय साहित्य वितरित करण्यात आले. अब्बास रिश्ते यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT