Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market: विक्रेत्यांना जुन्याच जागी व्यवसायास परवानगी

साखळी बाजाराबाबत आठवडी बाजार स्थलांतरित केलेल्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेनेच संबंधित भाजी विक्रेत्यांना पूर्वीच्या जागेत बसून व्यवसाय करण्यास सहमती दिली.

दैनिक गोमन्तक

Bicholim Market: साखळीतील आठवडी बाजाराच्या दिवशी हुसकावल्यानंतरही 'त्या' भाजी विक्रेत्यांनी सोमवारी पार्किंगसाठी आरक्षित ठेवलेल्या जागेतच बसून धंदा केला. उपलब्ध माहितीनुसार, आठवडी बाजार स्थलांतरित केलेल्या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेनेच संबंधित भाजी विक्रेत्यांना पूर्वीच्या जागेत बसून व्यवसाय करण्यास सहमती दिली आहे.

पूर्वी बाजार भरणारी ही जागा आता पार्किंगसाठी आरक्षित ठेवली आहे. विक्रेत्यांना पूर्वीच्या जागेत बसण्यास मोकळीक दिली असली, तरी पार्किंगला अडचण होणार नसल्याची काळजी घेतली आहे.

बाजार नवीन जागेत स्थलांतर केला तरी गेल्या सोमवारी काही विक्रेत्यांनी पुन्हा पूर्वीच्याच जागेत धंदा करण्याचा प्रयत्न केल्याने पालिकेने हुसकावून लावले होते.

नवीन बाजार फुल्ल!

२ जानेवारीपासून साखळीचा आठवडी बाजार नवीन जागेत स्थलांतर करण्यात आला आहे. बाजारात व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना नवीन जागेत जागाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. जागेच्या मुद्‍द्यावरून गेल्या दोन्ही बाजारात काहीसा गोंधळ झाला होता.

जागा उपलब्ध नसल्याने काही भाजी विक्रेते पूर्वीच्या जागेत बसले होते. मात्र पालिकेने त्या भाजी विक्रेत्यांना तेथून हलविले होते. जागा नसल्याने या विक्रेत्यांसमोर प्रश्‍न निर्माण झाला होता. अखेर या विक्रेत्यांना पूर्वीच्या जागेत सामावून घेण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT