Bicholim Market Dainik Gomantak
गोवा

Bicholim Market: वीज कनेक्शन तोडल्याने बाजारात अंधार; विक्रेते संतप्त

उद्यापर्यंत बाजार संकुलातील वीज पुरवठा पूर्ववत न केल्यास ''सोपो''भरणार नाही. असा इशारा संतप्त विक्रेत्यांनी दिला आहे.

दैनिक गोमन्तक

Bicholim Market: बाजार संकुलातील विजेचे बिल पालिकेतर्फे नियमितपणे भरण्यात येते. कोणतीही थकबाकी नाही. तांत्रिक प्रश्नामुळे हा गोंधळ झाला असावा. बाजार संकुलातील काही मात्र दुकानदारांनी विजेच्या बिलाचा भरणा केलेला नाही. त्यांची वीज जोडणी तोडण्यात आलेली.

विक्रेत्यांनी विनाकारण गैरसमज करुन घेऊ नये, असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले. ऐन आठवडी बाजाराच्या दिवशीच डिचोलीतील बाजार संकुलात अंधार पसरल्याने बाजारातील लहान -सहान विक्रेत्यांना मोठा फटका बसला. सायंकाळी धंदा झाला नसल्याने संतप्त विक्रेते एकवटले.

उद्यापर्यंत बाजार संकुलातील वीज पुरवठा पूर्ववत न केल्यास ''सोपो''भरणार नाही. असा इशारा संतप्त विक्रेत्यांनी दिला आहे. आधीच बाजार संकुलात वीज पुरवठ्याची समस्या आहे. त्यातच ग्राहकांची वर्दळही कमी असते.

त्यामुळे धंदा व्यवस्थित होत नाही. आठवडी बाजार म्हणजे धंदा करण्याचा दिवस. मात्र नेमका आठवडी बाजाराच्या दिवशी बाजारात काळोख पसरल्याने विक्रेत्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली. या संकुलातील दुकाने बंद झाल्यानंतर तर काळोखाचे साम्राज्य पसरले होते.

सकाळपासून विक्रेते संतप्त

पालिकेने वीज बिल भरले नसल्याने काल सकाळी बाजार संकुलातील वीज कनेक्शन तोडण्यात आले.पालिका आमच्याकडून नियमितपणे सोपो गोळा करते.

तरीदेखील वीज बिल भरण्याबाबतीत हलगर्जीपणा झाल्याबद्दल माया च्यारी, श्री. गावकर आदी विक्रेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उद्यापर्यंत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास ''सोपो''देणार नाही, असा इशारा या विक्रेत्यांनी दिला आहे.

बिल भरणा नियमित

बाजार संकुलातील विजेचे बिल पालिकेतर्फे नियमितपणे भरण्यात येते. कोणतीही थकबाकी नाही. तांत्रिक प्रश्नामुळे हा गोंधळ झाला असावा. बाजार संकुलातील काही मात्र दुकानदारांनी विजेच्या बिलाचा भरणा केलेला नाही.

त्यांची वीज जोडणी तोडण्यात आलेली. विक्रेत्यांनी विनाकारण गैरसमज करुन घेऊ नये, असे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail Drug Racket: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT