Opening Ceremony Gomantak Digital Team
गोवा

Bicholim : पिळगावात ‘गुणदर्शन’ सोहळा उत्साहात; मुलांच्या कलाविष्कारांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध

आयडियल हायस्कूलच्या डॉ. राममनोहर लोहिया सभागृहात मंगळवारी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली : नृत्य कलाविष्कार आदी कार्यक्रमांसह पिळगाव येथील बालभवन केंद्राचा ‘गुणदर्शन’ सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आयडियल हायस्कूलतर्फे बालभवन केंद्र चालविण्यात येत आहे. आयडियल हायस्कूलच्या डॉ. राममनोहर लोहिया सभागृहात मंगळवारी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून बालभवन-पणजीचे कार्यक्रम संचालक शशिकांत पुनाजी उपस्थित होते. अन्य मान्यवरात शिक्षणतज्ञ आणि आयडियल हायस्कूल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र गर्दे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर गावकर, पिळगाव बालभवन केंद्राचे अध्यक्ष तुकाराम साळगावकर आणि निवृत्त शिक्षिका दीपाली गोवेकर उपस्थित होते.

‘कौशल्य शिक्षण ही काळाची गरज आहे. मोबाईल आणि टिव्हीमुळे मुलांवर दुष्परिणाम होत असतात. दुष्परिणामांपासून मुलांना अलिप्त ठेवायचे असल्यास बालभवन योग्य पर्याय आहे’, असे मत रामचंद्र गर्दे व्यक्त केले. ज्ञानेश्वर गावकर, तुकाराम साळगावकर यांनी विचार मांडले. केंद्राची शिक्षिका रितू गावडे यांनी सूत्रसंचालन केले.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक

बालभवन केंद्रातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी नृत्य आदी कला सादर केल्या. मुलांनी मातीपासून सुंदर अशा वेगवेगळ्या कलाकृती तयार केल्या होत्या. गुणदर्शन सोहळ्यानिमित्त या कलाकृतींचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात आले होते. मुलांनी रंगवलेली चित्रेही या प्रदर्शनात मांडली होती. उपस्थित पालकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेवून मुलांच्या कलागुणांचे कौतुक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT