Bicholim Dainik Gomantak
गोवा

Bicholim News : बोर्डे वडेश्वर देवाच्या प्रांगणात मंगळवारी ‘होमकुंड’ उत्सव

Bicholim News : बोर्डे येथील शिमगोत्सवाचे आकर्षण असलेली प्रसिद्ध घोडेमोडणी बुधवारी (ता. २७) साजरी करण्यात येणार आहे. सायंकाळी गावतड येथे घोडेस्वारांना सजविण्यात येणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim News :

डिचोली, बोर्डे - डिचोली येथील शिमगोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला असून येत्या मंगळवारी (ता. २६) बोर्डेतील प्रसिद्ध ‘होमकुंड’ उत्सव साजरा करण्यात येणार आहे.

श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे.

मंगळवारी रात्री श्रींचा कलश मंदिराबाहेर काढण्यात आल्यानंतर होमकुंड पेटविण्यात येणार आहे. नंतर वाजत गाजत देवीच्या कलश मिरवणुकीसह व्रतस्थ भक्तगण गावतड येथील पवित्र झरीवर जाऊन त्या ठिकाणी स्नान करून पुनःश्च वाजत गाजत होमकुंडस्थळी येणार आहेत.

माघारी येताना श्री सातेरी, श्री महामाया, श्री रवळनाथ, श्री ब्राह्मण, श्री वडेश्वर आदी देवतांचा भोवमान करण्यात येणार आहे.

होमकुंड स्थळी आल्यानंतर मध्यरात्री पारंपरिक कार्यक्रमांनुसार श्रींच्या कलशासह व्रतस्थ भक्तगण ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ आदी देवदेवतांचा जयघोष करीत रखरखत्या होमकुंडातून अग्निदिव्य करणार आहेत. तत्पूर्वी रात्री ११ वा. श्री देवी माऊली दशावतार मंडळ, डोंगरपालतर्फे ‘संत बाळूमामा’ हा अध्यात्मिक नाट्यप्रयोगही होणार आहे.

बोर्डे - डिचोली येथील श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा प्रसिद्ध होमकुंड उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

बुधवारी घोडेमोडणी

बोर्डे येथील शिमगोत्सवाचे आकर्षण असलेली प्रसिद्ध घोडेमोडणी बुधवारी (ता. २७) साजरी करण्यात येणार आहे. सायंकाळी गावतड येथे घोडेस्वारांना सजविण्यात येणार आहे.

कोराटीच्या मैदानावर घोडेस्वार आल्यानंतर पारंपरिक पद्धतीने घोडेमोडणी साजरी करण्यात येणार आहे. दरम्यान, बोर्डे येथील गडे उत्सव शनिवारी (ता. २३) पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवाला भाविकांनी गर्दी केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT