Bicholim Crime News | Ram Mandir Social Media Post Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: राम मंदिराबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या 'त्या' युवकाला विद्यालयातून काढून टाका! संतप्त रामभक्तांची मागणी

Ram Mandir Social Media Post: पोस्ट करणारा विद्यार्थी अल्पसंख्याकांना भडकावून बहुसंख्याकांच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे.

Kavya Powar

Bicholim Crime News

लामगाव पाठोपाठ आता पिळगाव येथे राहणाऱ्या एका युवकाकडून सोशल मीडियावर अयोध्येतील श्रीराम मंदिरासंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली. यासंदर्भात डिचोलीतील या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र संतप्त रामभक्त शांत होण्याचे चिन्ह दिसत नाही.

रामभक्तांनी याबाबत संशयित असिफ करगडी याच्या श्री शांतादुर्ग उच्च माध्यमिक विद्यालय व्यवस्थापनाला निवेदन सादर केले आहे. सदर संशयिताला विद्यालयातून त्वरित काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे.

पोस्ट करणारा विद्यार्थी अल्पसंख्याकांना भडकावून बहुसंख्याकांच्या विरोधात वातावरण निर्माण करत आहे. याने रामभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत त्याला गावातून तडीपार करण्यात यावे, अशी मागणी संतप्त जमावाने पोलिसांकडे केली आहे. याबाबत त्यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशीही बोलणे झाले असल्याचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे.

तसेच, संशयिताच्या या कृत्यामुळे समाजात धार्मिक तणाव वाढून पुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यावर वेळीच कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रामभक्तांनी केली आहे.

याबाबतचे निवेदन आज विद्यालय व्यवस्थापनाकडे देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT