ATM  Gomantak Digital Team
गोवा

ATM Security in Bicholim: डिचोलीत बँकांचे ‘एटीएम’ कक्ष असुरक्षित?

पोलिसांकडून पाहणी : बहुतांश ठिकाणी रक्षकच नसल्याने सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर

गोमन्तक डिजिटल टीम

ATM Security in Bicholim: राष्ट्रीयकृतसह बॅंकांसह डिचोलीतील अनेक बँका सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत ढिल्या असल्याचे आढळून येत आहे.

डिचोलीतील बहुतेक बँकांचे ‘एटीएम’ कक्ष पोलिस पाहणीनंतर काही ठिकाणी सुरक्षा रक्षकच नसल्याने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. गेल्यावर्षी केरी येथील एका राष्ट्रीयकृत बँकेतील दरोड्याच्या घटनेनंतर पोलिसांनी केलेल्या पाहणीनंतर तसे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील ‘एटीएम’ कक्ष फोडण्याच्या घटना पाहता बँकांसह एटीएम कक्षांकडे सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवणे आवश्यक बनले आहे. डिचोली तालुक्यात ५० हून अधिक एटीएम कक्ष आहेत. काही कक्ष संबंधित बँकांना जोडूनच तर काही कक्ष बँकांपासून दूर अंतरावर बसस्थानक वा अन्य मोक्याच्या ठिकाणी आहेत.

मोजक्याच ‘एटीएम’ कक्षाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक दिसून येतात. तर सुरक्षा रक्षक नसल्याने बहुतेक कक्ष असुरक्षित बनले आहेत. रात्रीच्यावेळी तर हे 'एटीएम' कक्षांची सुरक्षा 'राम भरोसे' ठरत आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबतही प्रश्‍नचिन्ह !

काही एटीएम कक्षातील सीसी टीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत की नाहीत, त्याबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सुरक्षा व्यवस्थेअभावी रात्रीच्यावेळी अत्यावश्यक असतानाही पैसे काढण्यासाठी ‘एटीएम’ कक्षात जाणे धोकादायक बनले आहे.

डिचोलीत यापूर्वी एक-दोन वगळता एटीएम फोडण्याच्या मोठ्या घटना घडलेल्या नाहीत. तरीही राज्यातील घटना पाहता, भविष्यात चोरट्यांच्या टोळीकडून डिचोलीतील बँका आणि एटीएम कक्ष ‘टार्गेट’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT