Amthane Dam Water Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam Water : ‘आमठाणे’त अखेर पाणी; जलस्रोत खात्याकडून उपाययोजना

Amthane Dam Water : या धरणातील जलसाठा घटल्याचे वृत्त दै. ''गोमन्तक'' मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. ण्यात येते.

गोमन्तक डिजिटल टीम

Amthane Dam Water:

डिचोली, ‘आमठाणे’तील जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी या धरणात अखेर साळ बंधाऱ्यातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आले आहे. ऐन एप्रिल महिन्यात या धरणातील पाणी आटल्याने बंधाऱ्यातील पाणी धरणात सोडण्याचा निर्णय जलस्रोत खात्याकडून घेण्यात आला आहे.

पावसाळ्यापर्यंत धरणात पाणी पुरवठा करण्यात येणार असून, तोपर्यंत धरणातील जलसाठ्यावर आणखी परिणाम होणार नाही, असे जलस्रोत ात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या धरणातील जलसाठा घटल्याचे वृत्त दै. ''गोमन्तक'' मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. आमठाणे धरणातील पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात सोडण्यात येते. ण्यात येते.

जलसाठ्यात घट

मेणकुरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी ५२ मीटर एवढी आहे. गेल्या आठवड्यापर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी ८ मीटरनी घटताना ती ४४ मीटर एवढी झाली होती.

जलसाठा हळूहळू घटत होता. काल (गुरुवारी) सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठा ४३.८ मीटर एवढा झाला होता. धरणाच्या सभोवतालचे पात्र कोरडे पडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT