Amthane Dam  Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam: प्रतिक्षा कधी संपणार? 'आमठाणे धरण' अजूनही कोरडेच! गेट दुरुस्तीचे काम लांबणीवर

Amthane Dam Water Level: मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांकडून दुरुस्तीकाम जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होऊन धरणात पाणी साठवण्यास सुरवात करण्यात येईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

Sameer Panditrao

डिचोली: डिचोलीतील आमठाणे धरणावरील ‘गेट’ आदी दुरुस्तीचे काम निश्चित केलेल्या वेळेत पूर्ण झाले नसल्याने धरणातील जलसाठा करण्याचे काम आता लांबणीवर पडल्यातच जमा आहे.

त्यामुळे सध्या ९० हून अधिक टक्के कोरडे पडलेले धरण भरण्यास आणखी काही दिवस तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांसह जलसंपदा खात्याच्या मंत्र्यांकडून दुरुस्तीकाम जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होऊन धरणात पाणी साठवण्यास सुरवात करण्यात येईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला होता.

मात्र, जुलै महिना संपला, तरी दुरुस्तीचे काम निश्चित वेळेत पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आमठाणे धरण अद्याप कोरडेच आहे. कोणत्याही व्यत्ययाशिवाय दुरुस्तीकाम सुरळीतपणे करायला मिळाले, तर हे काम पूर्ण होण्यास आणखी किमान १५ ते २० दिवस लागण्याचा अंदाज आहे.

त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस धरणातील जलसाठा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, दुरुस्तीकाम शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यासाठी जलसंपदा खात्याचे अभियंते जातीने लक्ष ठेवून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT