Amthane Dam Dainik Gomantak
गोवा

Amthane Dam : ‘आमठाणे’ तील जलसाठा घटला; ४४ मीटर जलपातळी

Amthane Dam : सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी ४४ मीटर इतकी आहे. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडत असते.

गोमन्तक डिजिटल टीम

Amthane Dam :

डिचोलीतील 'आमठाणे' धरणातील जलसाठा घटला असून, धरण सभोवतालचे पात्र कोरडे पडल्याचे दिसून येत आहे.

सध्या या धरणातील जलसाठ्याची पातळी ८ मीटर अशी घटली आहे. दुसऱ्या बाजूने धरणातील पाण्याची पातळी कमी झाली असली, तरी या धरणात अद्याप साळ बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आल्याचे दिसून येत नाही. गेल्या महिन्याच्या तुलनेत धरणातील पाण्याच्या पातळीत बरीच घट झाली आहे.

सध्या धरणातील जलसाठ्याची पातळी ४४ मीटर इतकी आहे. दरवर्षी साधारण एप्रिल-मे महिन्यात धरणातील जलसाठ्यात घट होऊन सभोवतालचे पात्र कोरडे पडत असते.

यंदा मात्र एप्रिल महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच पाण्याची पातळी अपेक्षेबाहेर घटली आहे. गेल्या वर्षी समाधानकारक मोसमी पाऊस पडल्यानंतर ''आमठाणे'' धरणातील जलसाठ्याची पातळी समाधानकारक होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात हे धरण दोन वेळा तुडुंब भरले होते.

धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर

मेणकूरे-धुमासे पंचायत क्षेत्रात येणाऱ्या आमठाणे धरणाचे कार्यक्षेत्र ५८२ हेक्टर मीटर एवढे आहे. तर पाण्याची पातळी ५२ मीटर एवढी आहे. आज सायंकाळपर्यंत या धरणातील जलसाठ्याची पातळी ४४ मीटर एवढी होती.

'साळ'मधून पुरवठा नाही

जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी साळ येथील शापोरा नदीवरील बंधाऱ्यातील पाणी मोठ्या जलवाहिनीद्वारे या धरणात सोडण्यात येते. मात्र यंदा अजूनही बंधाऱ्यातील पाणी धरणात सोडण्यात आलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

Hindu New Year: 19 मार्चपासून हिंदू नववर्षाची सुरुवात! गुरु अन् मंगळच्या आशीर्वादानं उजळणार 'या' 4 राशींचं नशीब; नोकरी अन् शिक्षणात प्रगतीचा योग

''स्वप्नात वाटलं जीजूंनी पकडलं, म्हणून...'', 7 वर्षे कोर्टाच्या फेऱ्या अन् 19 दिवस खाल्ली जेलची हवा; अखेर पॉक्सो कोर्टाकडून एअरफोर्स जवानाची सुटका

LPG Crisis: क्रिकेटप्रेमींची चिंता वाढवणारी बातमी! आयपीएल 2026 वर गॅस संकटाचं सावट; बीसीसीआय लवकरच घेणार मोठा निर्णय?

Volkswagen Layoffs: ऑटोमोबाईल विश्वात मोठा भूकंप! 'फोक्सवॅगन' 50000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; पोर्शे अन् ऑडी सारख्या ब्रँड्सनाही फटका

SCROLL FOR NEXT