Bhumika Temple Dainik Gomantak
गोवा

Bhumika Temple: पोलिसांवर खूर्च्या भिरकावल्या, दगडफेक केली; पर्येतील भूमिका देवस्थान वादाला हिंसक वळण, 25 जखमी

Bhumika Temple Dispute: पोलिसांनी दोन्ही समाजांना मंदिराच्या गर्भकुडीत प्रवेश करण्यापासून रोखले.

Pramod Yadav

Bhumika Temple Dispute

सत्तरी: पर्येतील श्री भूमिका देवस्थानाच्या कालोत्सवावरुन महाजन आणि सेवेकरी यांच्यात झालेल्या वादाला हिंसक वळण लागले आहे. अडवून ठेवलेल्या संतप्त भाविकांनी पोलिसांवर खूर्च्या भिरकावण्यासह देवस्थानाबाहेर दगडफेक केल्याचे समोर आले आहे. या दगडफेकीत २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.

भूमिका देवस्थानात आज म्हणजेच (१५ जानेवारी) कालोत्सव साजरा होणार होता. यावरुन गावंकर आणि राणे समाज समोरा समोर आला. पोलिसांनी दोन्ही समाजांना मंदिराच्या गर्भकुडीत प्रवेश करण्यापासून रोखले. यात मोठ्या प्रमाणावर महिला समोर आल्या त्यांना थोपवताना पोलिसांची पूरती दमछाक झाली. दरम्यान, संतप्त लोकांनी पोलिसांवर खूर्च्या भिरकवल्या तसेच मंदिराबाहेर दगडफेकही केल्याचे सांगितले जात आहे.

यात कालोत्सवासाठी आलेल्या भाविकांसह इतर असे २५ जण जखमी झाले आहेत. पोलिस सध्या घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मंदिरात आज कालोत्सव आणि १६ जानेवारी रोजी गवळण साजरी होणार आहे. दरम्यान, गावकर समाजाने त्यांच्या मागण्यांसाठी मंदिरातच ठिय्या मांडला आहे.

वादाची पार्श्वभूमी लक्षात घेता श्री भूमिका मंदिर आणि परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. सकाळपासून या भागात तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळत आहे. दोन्ही गट आक्रमक झाल्याने पोलिसांना परिस्थिवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT