Flight To Goa Dainik Gomantak
गोवा

भोपाळ - गोवा विमानसेवा सुसाट, जयपूरसह महिन्याला प्रवासी संख्या लाखांच्या घरात

अलीकडेच इंडिगो एअरलाइन्सने जयपूरसाठी थेट विमानसेवा सुरू केली. भोपाळवरून थेट गोव्याला प्रथमच विमानसेवा सुरू झाली.

Pramod Yadav

Flights To Goa

भोपाळ येथून गोवा आणि जयपूरसाठी विमानसेवा सुरू झाल्यापासून प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सलग चौथ्या महिन्यात येथे प्रवाशांची संख्या एक लाखांहून अधिक नोंदवली आहे. दर महिन्याला ही संख्याही वाढत आहे. प्रवाशांची संख्या वाढल्याने नवीन उड्डाणे देखील सुरू होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडेच इंडिगो एअरलाइन्सने जयपूरसाठी थेट विमानसेवा सुरू केली. भोपाळवरून थेट गोव्याला प्रथमच विमानसेवा सुरू झाली. रायपूर फ्लाइटची वारंवारताही वाढवण्यात आली आहे. रायपूर उडान आता आठवड्याचे सातही दिवस सुरू आहे. बंगळुरू मार्गावरही अतिरिक्त उड्डाणे सुरू झाली आहेत.

यामुळे प्रवासी संख्या वाढली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात प्रवाशांची संख्या वाढली आहे. उड्डाणांची वारंवारताही वाढली आहे. गोवा फ्लाईट सध्या आठवड्यातून तीनदा चालते. आठवड्याचे सातही दिवस चालवले तर प्रवाशांची संख्या आणखी वाढू शकते. अशी शक्यता आहे.

एअर इंडियाचे पुणे विमानसेवा देखील लवकरच सुरू होईल, अशी आशा विमानतळ प्राधिकरण यांच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे. ही विमानसेवा सहा महिन्यांपासून बंद आहे. इंडिगोची कोलकाता आणि लखनौ फ्लाइट यावर्षी सुरू होऊ शकते. ही तिन्ही उड्डाणे सुरू झाली तर भोपाळची प्रवासी संख्या दीड लाख पर्यंत वाढू शकते.

गोव्यातील नवीन विमानतळामुळे भोपाळला थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, अशी आशा आहे. इतर शहरांसाठीही विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशी भोपाळ विमानतळ संचालक रामजी अवस्थी यांनी एका हिंदी वृत्तपत्राला माहिती दिली आहे.

प्रवाशांची संख्या आणि फ्लाइटची वारंवारता

महिना -- प्रवाशांची संख्या -- फ्लाइट

जानेवारी - 98,100 - 764

फेब्रुवारी - 96,947 - 899

मार्च - 103,338 - 842

एप्रिल - 104,666 - 820

मे - 114,322 - 872

जून - 117,073 - 886

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sri Lanka Vesak Festival Accident: श्रीलंकेत बौद्ध उत्सवादरम्यान भीषण अपघात, मद्यधुंद पिकअप चालकानं गर्दीला चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू तर 13 गंभीर जखमी

Bicholim Sports Ground: मोडलेली फाटके अन् कोसळणारे खांब! डिचोलीच्या ऐतिहासिक मैदानाचा खेळखंडोबा; खेळाडू धोक्यात

Gajlakshm Rajyog 2026: कुबेराचा खजिना रिता होणार, रातोरात चमकणार भाग्य! 'गजलक्ष्मी योग' 4 राशींना बनवणार करोडपती; गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम काळ

दक्षिणेतील मोर्चेबांधणी आणि काँग्रेसपुढील आव्हाने

Goa Monsoon: पावसाळापूर्व तयारी केवळ बैठकांपुरतीच

SCROLL FOR NEXT