Road Repairing  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भोम ग्रामस्थांचा रस्तारुंदीकरणास तीव्र विरोध कारण...

भोम येथे रस्तारुंदीकरणाच्या कामासंबंधी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी हाकलून लावले.

दैनिक गोमन्तक

Goa News: भोम येथे रस्तारुंदीकरणाच्या कामासंबंधी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी हाकलून लावले. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामस्थ आणि सरकार यांच्यातील संघर्ष ऐरणीवर आला आहे. भोम येथील रस्तारुंदीकरणासाठी जमीन 1971 मध्ये संपादन केली होती.

तसेच त्यानंतर पंचायतीने दिलेल्या परवानगीला जोडून प्रतिज्ञापत्र होते की रस्ता रुंदीकरणाला जमीन दिली जाईल. शिवाय भोम येथे फोंड्याला जाताना दोन घरे सोडल्यास रस्त्याच्या डावीकडे असलेली बांधकामे अनाधिकृत आहे, असे विधान सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केले. पणजी येथे ते पत्रकारांशी बोलत होते.

रस्तारुंदीकरणसंदर्भात ग्रामस्थांनी माझी भेट घेतली होती. तेव्हाच त्यांना स्पष्ट केले होती की रुंदीकरणासाठी जमीन पूर्वीच संपादन झाली आहे. त्यापूर्वी तेथे असलेल्या घरमालकांना नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना घर बांधून दिले जाईल असा प्रस्ताव दिला होता.

तसेच उजीकडे असलेले मंदिर वाचवण्यासाठी प्रयत्न केले असून रुंदीकरणात मंदिराला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली गेली आहे. मंदिरातील पारंपरिक विधी त्यांना करता यावे यासाठी डावीकडे रस्ता जरा उंच केला जाईल, जेणेकरून विधी सुरळीतपणे करता येतील, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.

बेकायदा दुकानांना नुकसान भरपाई नाही

भोम येथे फोंड्याला जाताना डावीकडे असलेली दुकाने रातोरात तेथे उभी झाले आहेत. त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई देता येणार नाही. काराण ही बांधकामे बेकायदेशीर आहेत. त्यांच्यासाठी रस्ता दुसरीकडे वळविण्याचा प्रश्‍न येत नाही. कारण प्रक्रिया पूर्वीच निश्‍चित झाली आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT