Bhausaheb Bandodkar Ground Dainik Gomantak
गोवा

Ponda: आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास! नवीन वॉकिंग ट्रॅकवर भेगा, ज्येष्ठांना दुखापत झाल्यास जबाबदार कोण?

Bhausaheb Bandodkar Ground: पावसाळा सुरू असल्यामुळे या भेगांमध्ये पाणी साचायला लागल्यामुळे ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी लोकांची अवस्था झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

काशिमठ-बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदान हे एक फोंड्यातील लोकप्रिय मैदान. या मैदानावर खेळाबरोबरच लोक चालण्याचाही आनंद लुटत असतात. येथील जुना ट्रॅक बरेच लोक वापरतात. तिथे टर्फ असल्यामुळे तिथे वॉकिंग करताना एक वेगळीच अनुभूती मिळत असते. आरोग्याच्या दृष्टीनेही हा ट्रॅक अनेकांना लाभदायक ठरला आहे; पण सध्या या ट्रॅकची दुर्दशा झाली असून जागोजागी भेगा पडलेल्या दिसत आहेत.

सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे या भेगांमध्ये पाणी साचायला लागल्यामुळे ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी लोकांची अवस्था झाली आहे. त्यामुळे चालणाऱ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. नवीन ट्रॅकचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जुन्या ट्रॅकचे नूतनीकरण केले जाईल, असे आश्‍वासन दिले होते. पण नवीन ट्रॅकला वर्ष होऊनही अजूनही जुन्या ट्रॅकची दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे या भेगा दिवसेंदिवस वाढत चालल्या असून बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना चालताना अडखळल्यासारखे होते.

फोंड्यात जरी वॉकिंगकरता दोन ट्रॅक असले तरी अनेक ज्येष्ठ नागरिक वॉकिंगकरता काशिमठ-बांदोडा येथील भाऊसाहेब बांदोडकर मैदानाला प्राधान्य देताना दिसतात. ते शांत ठिकाणी असल्यामुळे तिथे वॉकिंग करायला एक वेगळीच मजा येते; पण सध्या या वॉकिंग ट्रॅकच्या मुख्य भागाला भेगा पडल्यामुळे तिथे चालणे कठीण व्हायला लागले आहे. त्यामुळे या भागाचे लवकरात लवकर नूतनीकरण करून आम्हा ज्येष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा.
राम कुंकळकर, ज्येष्ठ नागरिक, फोंडा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT