Bhandari Samaj Dainik Gomantak
गोवा

Bhandari Community In Goa: भंडारी समाजाचे कार्यालय फोडायचे आहे का? अध्यक्ष नाईक यांची विचारणा

Bhandari Samaj: या आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी समाजाच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: फोंडा येथे रविवारी स्नेहमेळावा घेऊन भंडारी समाज कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा देणाऱ्यांना समाजाचे कार्यालय फोडायचे आहे का, अशी विचारणा गोमंतक भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना केली.

अशा कृतीतून समाजाचेच नुकसान होईल. समाजाच्या समितीची मुदत नोव्हेंबरपर्यंत असल्याने त्याआधी त्याबाबत विचार कसा करता येईल, अशी विचारणाही त्यांनी केली. त्यांच्या समितीला पायउतार होण्यासाठी समाजबांधवांनी १० दिवसांची मुदत दिली आहे. अन्यथा अस्थायी समिती नेमण्यासह कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.

बदनामी करायची नाही. ज्यांना समाजाच्या चार भिंतींच्या आत राहायच्या गोष्टी जाहीरपणे चर्चा करायच्या आहेत, ते तसे करण्यास मोकळे आहेत. या मेळाव्याचा कसा प्रतिवाद करायचा, याचा निर्णय घेतलेला नाही. या आठवड्यात शुक्रवारी किंवा शनिवारी समाजाच्या कार्यकारी समितीची बैठक घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आम्हाला संघर्ष नको आहे. याचा अर्थ बेकायदेशीर गोष्टी कराव्यात, असाही होत नाही. मोर्चा काढून कोणाला कार्यालय फोडायचे आहे का? त्याने समाजाचेच नुकसान होईल. आम्हाला कोणाविषयी आकस नाही. जे काही करायचे ते समाजासाठी करायचे, असे आमचे धोरण आहे. गेले सहा वर्षे मी समाजाच्या भल्यासाठी झटलो. १२ तालुक्यांतील कोणालाही विचारल्यास हे समजून येईल.

आमच्या समितीची मुदत नोव्हेंबरपर्यंत

आमच्या समितीची मुदत नोव्हेंबरपर्यंत आहे. त्याचमुळे बेकायदेशीरपणे बोलावलेल्या आमसभेला आणि निवडणुकीला स्थगिती दिली आहे. न्यायालयाचा निवाडा हाच आमची समिती वैध आहे हा पुरावा आहे आणि तो सर्वांनीच मान्य केला पाहिजे. समाजाचे नुकसान होईल असे कोणी वागता कामा नये. जाहीर आरोप-प्रत्यारोपांतून काही साध्य होणार नाही, असे नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT