भजन कलाकारांचा पोशाख व पेहराव Dainik Gomantak
गोवा

गोवा क्षत्रिय मराठा समाजातर्फे 2 ऑगस्टला भजन स्पर्धा

पणजी येथे पार पडणार 26 वी अखिल गोवा भजनी स्पर्धा

दैनिक गोमन्तक

पणजी: गोवा क्षत्रिय मराठा (तारुकर) समाजातर्फे पणजी येथील महालक्ष्मी मंदिरात साजऱ्या होणाऱ्या श्रावणमास अखंड भजनी सप्ताहाच्या ‘पारा’निमित्त 26 वी अखिल गोवा भजनी स्पर्धा 2 ऑगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता महालक्ष्मी देवालय पणजी येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 13 भजनी पथकांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख 22 जुलै आहे. (Bhajan competition at Panaji on 2nd August by Goa Kshatriya Maratha Samaj )

यात पुरूष गटात आठ व समाजातर्फे एक आरक्षित पथक, महिला गटात 4 मिळून एकूण 13 भजनी पथकांचा समावेश असणार आहे. पुरुष गटात प्रथम पारितोषिक 15,001 रु. व राजदीप बिल्डर्स पुरस्कृत चांदीचा फिरता चषक, द्वितीय पारितोषिक 10,001 रु. व तृतीय पारितोषिक 7,001 रु. व उत्तेजनार्थ सहा पथकांना अनुक्रमे 2,001 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

महिला गटासाठी प्रथम पारितोषिक 7,001 रु. व ॲड. मीरा निवृत्ती मेढेकर पुरस्कृत फिरता चषक, द्वितीय पारितोषिक 5,001 रु., तृतीय 3,001 रु. व उत्तेजनार्थ 2,001 रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. त्याशिवाय उत्कृष्ट गायक, पखवाजवादक, हार्मोनियमवादक आणि गवळण गायक यांना प्रत्येकी 2,001 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत.

दरम्यान, सकाळच्या सत्रात 9 ते दु. 3 वाजेपर्यंत वारकरी दिंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी इच्छुक दिंडी पथक प्रमुखाने 23 जुलैपर्यंत नोंदणी करावी. तसेच 2019 च्या भजनी स्पर्धेत पुरूष व महिला गटातील प्रथम विजेत्या पथकास थेट प्रवेश दिला जाईल; मात्र त्यांना प्रवेश पत्रिका नेणे आवश्‍यक आहे, असे कळवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT