ISI Mark Helmet  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील दुचाकी चालकांनो सावधान; आयएसआय हेल्मेट सक्तीचे

मोटार वाहन कायद्यात आयएसआय मार्क असलेले हेल्मेट वापरण्यास परवानगी

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात नव्या मोटार वाहन कायद्यातील नियमांची अंमलबजावणी राज्यात सुरू झाल्यानंतर आता बिगर आयएसआय हेल्मेट वापणाऱ्या दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे जे हेल्मेट आयएसआय मार्क नसेल त्या चालकाला दंडात्मक कारवाई सामोरे जावे लागणार आहे.

मोटार वाहन कायद्यात आयएसआय मार्क असलेले हेल्मेट वापरण्यास परवानगी आहे मात्र अनेक चालक स्वस्त तसेच आयएसआय मार्क नसलेली हेल्मेट वापरत होते तसेच पर्यटकांना देण्यात येणाऱ्या ‘रेंट ए बाईक’साठी अशीच हेल्मेट दिली जात होती.

मात्र अशा हेल्मेटवर पूर्ण बंदी आहे. लोकांच्या व पर्यटकांच्या हेल्मेटवरून तक्रारी येत असल्याने व त्यांची सतावणूक होत असल्याच्या कारणावरून वाहतूक पोलिस डोक्यावर असलेले हेल्मेट हे आयएसआय मार्कचे आहे की नाही त्याची तपासणी करत नव्हते. आता दुचाकीस्वारांना अशी हेल्मेट वापरण्यापासून बंदी असेल. आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट जरी असले तरी ते नाही अशा गुन्ह्याखाली दंडात्मक कारवाई केली जाईल अशी माहिती वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

कारवाईची रक्कम अधिक

रस्ता वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याचे निर्देश देऊन दर महिन्याला त्याचा अहवाल मागत आहेत त्यामुळे वाहतूक पोलिसांचीही झोप उडाली आहे. त्यामध्ये आयएसआय मार्क नसलेल्या हेल्मेटधारकांविरुद्ध तसेच दुचाकीवर मागे बसलेल्या स्वाराने हेल्मेट न घातलेल्या किती प्रकरणे नोंद झाली आहेत याची माहिती मागितली जात आहे. हेल्मेट न वापरल्यास पूर्वी वाहतूक पोलिस 100 रुपये दंड देत होते मात्र आता नव्या सुधारित मोटार वाहन कायद्यातील नियमांनुसार त्यासाठी 1 हजार रुपये दंड देणे सक्तीचे आहे. हेल्मेटच्या किमतीपेक्षा दंडात्मक कारवाईची रक्कम अधिक झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT