Beware of fake police in goa Dainik Gomantak
गोवा

तोतया पोलिसापासून सावध !

शोभित सक्सेना : भामट्यांविरुध्द अनेक तक्रारी

दैनिक गोमन्तक

पणजी: पोलिस असल्याचे सांगून लोकांचे दागिने तपासणीसाठी मागवून घेऊन ते लंपास करणारा भामटा राज्यात फिरत असून त्यापासून सावध व दक्ष राहावे. उत्तर व दक्षिण गोव्यात याप्रकाराच्या तक्रारी दाखल झाल्या असून अशा व्यक्तीचा संशय आल्यास त्याची माहिती द्यावी,असे आवाहन उत्तर गोवा पोलिस अधीक्षक शोभीत सक्सेना यांनी केले आहे.

(Beware of fake police in goa)

तोतया पोलिस अधिकाऱ्याने म्हापसा, पर्वरी तसेच दक्षिण गोव्यातील काही भाग फिरून काही महिलांना लक्ष्य करून त्यांचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलिस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींमध्ये नमूद चोरट्याची चोरीची पद्धत एकसारखीच आहे, त्यामुळे यामध्ये तोच चोरटा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या चोरट्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

संशयिताचे रेखाचित्र बनवणार !

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित पोलिस अधिकारी असल्याचे सांगून तपासकामासाठी आल्याचे सांगतो. जिथे तो जातो तेथील कुटुंबीयांना त्यांचे दागिने दाखवा,असे सांगतो. पोलिस असल्याने प्रामाणिकपणे ते दाखवतात. त्यानंतर तो सर्व दागिने एका पाकिटात घालतो व त्यासोबत इतर काही वस्तू ठेवतो. हे सर्व करताना तो त्यांच्यावर भूल देणारी वस्तू टाकून तेथून पसार होतो. भूल उतरते तोवर तो दागिने घेऊन पसार होतो. पोलिसांनी संशयिताचे रेखाचित्र काढण्यासाठी तक्रारदारांची मदत मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT