जगभरातील अनेक देशात उष्णतेची लाट आहे, अशावेळी उष्म्यापासून दिलासा मिळावा, यासाठी नागरिक मोठ्याप्रमाणात थंड पाणी पितात.
उन्हातून आल्या-आल्या फ्रिजमधील थंड पाणी पितात, परंतु असं केल्याने आरोग्यावर त्याचे किती भीषण परिणाम होतात, याची अनेकांना कल्पना नसते. उन्हाळ्यात थंडगार पाणी प्यायल्याने आपल्याला आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जर तुम्हालाही उन्हाळ्यात थंडगार पाणी प्यायची सवय असेल, तर आधी त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या..
उन्हाळ्यात काय करावं?
उन्हातून आल्यावर लगेचच थंड पाण्याने हात-पाय धुणे टाळावे, तसेच आंघोळ करण्यापूर्वी किमान अर्धा तास थांबून नंतरच अंघोळ करावी.
फ्रिजच्या पाण्याला पर्याय म्हणजे, उन्हाळ्यात तुम्ही मातीच्या मडक्याचा अर्थात माठाचा वापर करू शकता. माठातील गार पाणी प्यायल्याने शरीराला कोणताही त्रास होत नाही.
उन्हाळ्यात कोमट पाणी पिणे उत्तम. फळांचे सरबत, दही, ताक प्या तेही‘रूम टेम्परेचर’नुसार उत्तम.
काय होऊ शकतं?
१ फ्रिजमधील थंड पाण्याचा हृदयाच्या गतीवर गंभीर परिणाम होतो. मज्जासंस्थेचं संतुलन बिघडतं. हृदयगती मंदावून पक्षाघाताचा झटका येऊ शकतो.
२ उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने सर्दी- खोकला होण्याची शक्यता वाढते.
३ सतत थंड पाणी प्यायल्याने त्याचा परिणाम रक्तपेशींवर होतो. आपल्या पचनावर होतो. यामुळे पचनक्रिया मंदावते.
४ जे लोक वजन घटवू पहात आहेत, त्यांनी थंड पाणी टाळावे. थंड पाणी पिण्याने फॅट्स बर्न होण्यात अडचण निर्माण होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.