Goa Rough sea Dainik Gomantak
गोवा

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Betul Floating Jetty: मागील दोन दिवसांपासून दक्षिण गोव्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने समुद्र खवळलेला आहे

दैनिक गोमन्तक डिजिटल

मडगाव: मागील दोन दिवसांपासून दक्षिण गोव्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू असल्याने समुद्र खवळलेला आहे. दरम्यान, बेतूल येथे सुमारे १०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या तरंगत्या जेटीची मोठ्या प्रमाणावर हानी झाली.

स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार, बेतूल येथे साळ नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर ही जेटी उभारण्यात येत होती. खवळलेल्या समुद्राच्या तडाख्यात या जेटीचे दोन खांब वाहून गेले. या संदर्भात किनारपट्टी पोलिसांना विचारले असता, खवळलेल्या समुद्रामुळे या जेटीचा थोडासा भाग कललेला असल्याचे त्यांनी सांगितले.

पडझडीच्या घटना दरम्यान, दक्षिण गोव्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून, विशेषतः किनारपट्टी भागात ही हानी अधिक प्रमाणात दिसून आली. नावेली भागात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने गावातील वीजपुरवठ्यावरही परिणाम झाला होता.

जेटीला स्थानिक मच्छीमारांचा विरोध

ओएनजीसीकडून उभारण्यात येणाऱ्या या जेटीला स्थानिक मच्छीमारांनी विरोध केला होता.

यासंदर्भात कुटबण मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी सांगितले की, या जेटीमुळे दुर्घटना होऊ शकतात, अशी भीती आम्ही यापूर्वीच व्यक्त केली होती. या पावसात ते स्पष्ट झाले आहे.

स्थानिक आमदार क्रुझ सिल्वा यांनी सांगितले की, केवळ व्हीव्हीआयपी व्यक्तींना ओएनजीसी प्रकल्पात येण्यासाठी शॉर्टकट उपलब्ध व्हावा, या एकमेव उद्देशाने ही फ्लोटिंग जेटी बांधण्यात आली असून, ती सध्या धोकादायक स्थितीत उभी आहे. ही जेटी उभारताना आवश्यक असलेले परवाने ओएनजीसीने घेतले आहेत की नाही, याची चौकशी करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. केळशीचे सरपंच डिक्सन वाझ यांनी यापूर्वी ही जेटी कलल्याचे दिसून आल्यानंतर आपण आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत सुरक्षेचे उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT