Panjim Dainik Gomantak
गोवा

Beti Ferry Boat: नदीत बुडालेल्या 'बेती' फेरीबोटीचा अर्धा भाग वर! 'विनयदीप एंटरप्रायझेस-कनिष्का साल्वेज'च्या सामूहिक प्रयत्नांना यश

Beti Ferry Boat: चोडण येथील जेटीजवळ बुडालेल्या ‘बेती’ या फेरीबोटीचा अर्धा भाग उचलून बाहेर काढण्यात विनयदीप एंटरप्रायझेस व कनिष्का साल्वेजच्या कर्मचाऱ्यांना यश आले.

Sameer Amunekar

पणजी: चोडण येथील जेटीजवळ बुडालेल्या ‘बेती’ या फेरीबोटीचा अर्धा भाग उचलून बाहेर काढण्यात विनयदीप एंटरप्रायझेस व कनिष्का साल्वेजच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दोन्ही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी सामूहिक केलेल्या प्रयत्नामुळे अर्धा भाग उचलला गेला आहे. उद्या, बुधवारी ओहोटीच्यावेळी उर्वरित भाग उचलण्यात येणार असल्याची माहिती नदी परिवहन खात्याचे संचालक विक्रमसिंह राजेभोसले यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

चोडण जेटीवर नांगरून ठेवलेली ‘बेती’ ही फेरीबोट मागील आठवड्यात सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बुडाली होती. ती बोट बाहेर काढण्यासाठी स्थानिक कंपनी खोर्लीच्या विनयदीप एंटप्रायझेसला काम देण्यात आले.

या कंपनीने तिसऱ्या दिवशी बोट काढण्यास सुरुवात केली. संबंधित कंपनीकडून बोट काढण्यास होणारा विलंब पाहता काल (सोमवारी) या कंपनीला दुपारपर्यंत बोट काढण्याचा प्रयत्न करा, असे सूचित केले होते.

त्यानुसार बुडालेल्या बोटी काढण्याचा अनुभव असलेल्या वास्कोतील कनिष्का साल्वेजशी नदी परिवहन खात्याने चर्चा केली. परंतु कनिष्का साल्वेजच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून ‘विनयदीप''च्या कर्मचाऱ्यांना आम्ही मदत करू त्यांनाच ती काढू द्यावी, असे आरएनडीच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. त्यानुसार विनयदीपला ‘कनिष्का’च्या कर्मचाऱ्यांनी मदत केली. त्यामुळे सायंकाळपर्यंत अर्धा भाग पाण्याबाहेर उचलण्यात यश आले.

उर्वरित काम आज उरकणार!

उर्वरित भाग पाण्याबाहेर काढण्यासाठी ओहोटीची वाट पहावी लागणार असल्याने उद्या, बुधवारी पुढील काम केले जाणार आहे. फेरीबोट जेवढ्या वर उचलण्यात आली आहे, ती पुन्हा पाण्यात जाऊ नये, यासाठी बोटीच्या दोन्ही बाजू दोरखंडांने जेटीच्या खांबाला बांधून टाकल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT