Sange Bendwada Bridge Dainik Gomantak
गोवा

Sanguem News: 'तारीमळ'वासियांचा रस्ता होणार बंद! बेंडवाडा-सांगे पुलाचे ग्रहण सुटेना; सात वर्षे रेंगाळले काम

Sanguem Bendwada Bridge: बेंडवाडा-सांगे येथील पुलाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. मुळात पुलाच्या कामाची सुरवात होताच कोरोना महामारी आली आणि नंतर अडचणी वाढतच गेल्या. परिणामी गेली सात वर्षे या पुलाचे काम रेंगाळले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem Bendwada Bridge

सांगे: बेंडवाडा-सांगे येथील पुलाला लागलेले ग्रहण अद्याप सुटलेले नाही. मुळात पुलाच्या कामाची सुरवात होताच कोरोना महामारी आली आणि नंतर अडचणी वाढतच गेल्या. परिणामी गेली सात वर्षे या पुलाचे काम रेंगाळले आहे. दरम्‍यान, तारीमळ सांगे येथील नागरिकांनी आपल्या गावात जाणारा रस्ता बंद होणार असल्याने पर्यायी रस्‍त्‍यासाठी एकजुटीने मागणी केली आहे.

मुख्य रस्त्यापासून तारीमळ गाव अवघ्या पाचशे सहाशे मीटर अंतरावर आहे. या रस्त्यावर पुलाचे बांधकाम येत असल्यामुळे तारीमळ भागात जाणारा रस्ता बंद होणार आहे. त्या भागातील जनतेला जाण्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था पुलाच्या बांधकाम आराखड्यात नसल्याने यापूर्वीसुद्धा तारीमळवासीयांनी बांधकाम कंत्राटदाराला जाब विचारला होता. मात्र थातूरमातूर उत्तरे त्‍याच्‍याकडून देण्यात आली होती.

स्थानिक आमदारांना याबाबतची कल्‍पना दिली असता त्‍यांनी, आपण पर्यायी वाहतूक व्यवस्था आराखड्यात केली असल्याचे कागदपत्रे आणून दाखवितो, असे उत्तर दिले होते. पण अद्याप पर्यायी व्यवस्था दाखविणारा कागदही नाही आणि कंत्राटदारही नसल्याचे कोस्तांव मास्कारेन्‍हस यांनी सांगितले. गावातील महिला म्हणाल्या, जर कंत्राटदार गावात जाणारा रस्ता अडवून बांधकाम करत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. सांगे शहर केवळ दीड किमी अंतरावर आहे आणि हा रस्ताच बंद करून टाकल्यास शहरात जाण्यासाठी पाच किलोमीटर अंतर कपावे लागणार आहे. हे ग्रामस्थांना परवडणारे नाही.

उड्डाणपूल हाच एकमेव पर्याय

तारीमळ गावात जाणारा रस्ता बंद न करता नवीन बांधणाऱ्या पुलाचा भाग उड्डाणपुलाने पूर्ण केल्यास ग्रामस्‍थांना आहे त्याच रस्त्याचा वापर करणे शक्य होईल. पुलाचा आराखडा तयार करताना ग्रामस्‍थांना विश्‍‍वासात घेतले नाही. आता उड्डाणपूल हाच पर्याय आहे, असे त्‍यांचे म्‍हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT