Dabolim Airport Dainik Gomantak
गोवा

Dabolim Airport: बेल्जियन नागरिकाला दाबोळी विमानतळावर अटक; मुंबईच्या विमानात चढताना केली कारवाई...

गोवा पोलिसांकडून तपास सुरू

Akshay Nirmale

Dabolim Airport: गोव्यातील दाबोळी विमानतळावरून मुंबईला जात असलेल्या एका बेल्जियन नागरिकाला गोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईच्या फ्लाईटमध्ये चढतानाच त्याच्यावर कारवाई करण्यात आली.

ट्रॅकिंग डिव्हाईस सोबत बाळगल्यावरून त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गोवा पोलिसांनी ही माहिती दिली. ब्रायस एमिली अँटोनी जी (वय 47) असे त्याचे नाव आहे.

वास्को येथील पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार ट्रॅकर डिव्हाइस बाळगल्याप्रकरणी या परदेशी नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडील उपकरण हे एक जीपीएस ट्रॅकर डिव्हाइस होते.

फ्लाइटमध्ये चढत असताना तो ते उपकरण सोबत घेऊन जात होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे," असे पोलिसांनी सांगितले. सध्या पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT