Strong opposition to mobile towers Dainik Gomantak
गोवा

बेले-नावेली येथे स्थानिकांचा मोबाईल टॉवरला तीव्र विरोध

टॉवर उभारून झाला, तरी स्थानिकांची न्यायालयीन लढाई सुरूच

दैनिक गोमन्तक डिजिटल

बेले-नावेली येथे जंक्शनवर उभारण्यात येणाऱ्या मोबाईल टॉवरला स्थानिकांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. टॉवर उभारून झाला, तरी स्थानिकांची न्यायालयीन लढाई सुरूच आहे.

रविवारी स्थानिकांनी मोबाईल टॉवरची पाहणी केली, त्यावेळी अविता लोबो यांनी सांगितले की, सुरुवातीला येथे सार्वजनिक बांधकाम खात्याचे काम सुरू आहे, असा बोर्ड लावण्यात आला होता.

परंतु रात्रीच्या वेळी येथे मोबाईल टॉवरची कंपनी काम करीत असे. शिवाय त्यांना महिला व पुरुष पोलिसांचे संरक्षण देण्यात आले होते, असे लोबो यांनी सांगितले.

आता या विषयावर उच्च न्यायालयात 7 एप्रिल रोजी सुनावणी होणार असून कंपनीला सर्व कागदपत्रे सादर करण्यास सांगितले असल्याचे स्थानिक रहिवासी बेंतो डिसिल्वा यांनी सांगितले.

हा प्रश्र्न स्थानिक आमदारांकडे उपस्थित केला होता. त्यांना आम्ही निवेदनसुद्धा दिले आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आपण काहीच करू शकत नाही, असे आमदारांनी आम्हाला सांगितल्याचे डिसिल्वा यांनी सांगितले.

न्यायालयाचीही केली दिशाभूल

बेंतो डिसिल्वा म्हणाले की, सुरुवातीला येथे साधा खांब उभारणार, असे सांगण्यात आले होते. उच्च न्यायालयातसुद्धा त्यांनी खोटेपणा केला आहे. न्यायालयातही त्यांनी साधा खांबच उभारणार, असे सांगितले. हा मोबाईल टॉवर इंडस टॉवर कंपनीने उभारला आहे.

एरव्ही त्यांना सर्वे नंबर 68/11 मध्ये परवानगी दिली होती. प्रत्यक्षात त्यांनी सर्वे नंबर 68/09 मध्ये टॉवर उभारला आहे, असे बेंतो डिसिल्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

Donald Trump Iran Jail: डोनाल्ड ट्रम्पला इराणनं तुरुंगात डांबलं? तेहरानमधील व्हायरल व्हिडिओनं जगात खळबळ; अमेरिकेच्या दादागिरीला चोख प्रत्युत्तर VIDEO

Codli Iron Ore Mine: कोडली खाण पुन्हा सुरू करण्यावर संमिश्र प्रतिक्रिया; रोजगाराची आशा, पण पाणी, शेती आणि प्रदूषणाची गंभीर चिंता

Made In India Smartphone Brand: ॲपल-सॅमसंगला देणार टक्कर! भारत 2028 पर्यंत लॉन्च करणार स्वतःचा स्मार्टफोन ब्रँड; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट

Goa Weather Update: काणकोणमध्ये वादळी पावसाचा तडाखा! चावडीत झाड कोसळून वाहतूक कोंडी; शेळेरमध्ये घराचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT