Ganebail toll plaza NH-748  Dainik Gomantak
गोवा

काम अपूर्ण तरी बेळगाव - गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; 16 किमीसाठी दर निश्चित, सवलतही जाहीर

अशोका बेळगाव खानापूर रोड प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी टोल वसूल करणार आहे.

Pramod Yadav

बेळगाव- गोवा महामार्गावरील टोल वसुली सुरू करण्याची भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अधिकृत घोषणा केली आहे. आजपासून (दि.11 जुलै) गणेबैल येथे टोल वसुलीला सुरूवात झाली आहे.

अशोका बेळगाव खानापूर रोड प्रायव्हेट लिमिटेड ही एजन्सी टोल वसूल करणार आहे. अलिकडेच अपग्रेड करण्यात आलेला चारपदरी मार्ग NH-748 (जुना NH-4A) कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांना जोडतो.

बेळगांव-खानापूर या 30 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम सुरू आहे. यापैकी केवळ 16.34 किलोमीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहतुकीस खुला केलेल्या या मार्गासाठी टोल वसुलीचा दर निश्चित केला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत हे दर लागू असतील.

अशी असेल सवलत

सर्व वाहनांच्या प्रवासासाठी चोवीस तासाच्या आत परतीचा प्रवास केल्यास 25 टक्के सवलत असेल. तर, एका महिन्यात 50 वेळा प्रवास केल्यास 33 टक्के सूट आहे. टोल प्लाझा असलेल्या जिल्ह्यात नोंदणी असलेल्या वाणिज्य वाहनांना (राष्ट्रीय परवाना वगळता) 50 टक्के सूट देण्यात आली आहे.

स्थानिकांसाठी टोल प्लाझापासून 20 किलोमीटरच्या परिघात असलेल्या बिगर वाणिज्यक वाहनांना 2023-24 सालासाठी मासिक 330 रुपयांचा पास देण्यात येणार आहे.

बेळगावी-खानापूर विभागातील चारपदरी NH 4A मार्गाची लांबी 30.800km आहे. एकूण प्रकल्पाच्या 16.365 किमीच्या पूर्ण झालेल्या भागासाठी टोलवसुली सुरू केली आहे . प्रकल्पाचा खर्च 1,154 कोटी रुपये आहे.

बेळगाव खानापूर पणजी या महामार्गावर फक्त कानडी आणि इंग्रजी भाषेत दिशादर्शक फलक लावण्यात आले होते.

दरम्यान, बेंगलोर येथील NHAI च्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी बेळगाव पणजी महामार्गावर मराठी भाषेत दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देश धारवाड येथील NHAI च्या विभागीय कार्यालयाला दिले आहेत.17 फेब्रुवारी 2023 राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे (NHAI) याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT