Goa Politics jpg Dainik Gomantak
गोवा

Goa politics: अल्पसंख्याक मतदारसंघ असल्याने विरोधकांना पाठबळ

Goa politics: सांताक्रुझमध्ये भाजपला आव्हान : ‘आरजी’चा जोरदार प्रचार; त्रिकोणी सामना रंगणार; काँग्रेसचा बालेकिल्ला

दैनिक गोमन्तक

Goa politics:

प्रसाद सावंत

सांताक्रुझाचा इतिहास काढून पाहिल्यास हा मतदारसंघ सुरवातीच्या काळात युगो आणि नंतर काँग्रेसचा बालेकिल्ला ठरला आहे. माजी आमदार टोनी फर्नांडिस आणि विद्यमान आमदार रुडॉल्फ फर्नांडिस फुटून भाजपमध्ये गेले,

तरीदेखील भाजपसाठी वाट सोपी असणार नाही. याची दोन कारणे म्हणजे बहुसंख्य मतदार हे अल्पसंख्याक आहेत आणि आमदार फुटला असला तरी काँग्रेसचे मतदार पक्षाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजकीय पक्षांनी आपली कंबर कसायला सुरवात केली आहे. तिसवाडी तालुक्यातील सांताक्रुझ मतदारसंघात सध्या राजकारण बरेच तापले असून त्रिकोणी सामना रंगणार आहे.

पारंपरिकरीत्या हा मतदारसंघ काँग्रेससोबत राहिला असला, तरी मागचे दोन काँग्रेस आमदार टोनी फर्नांडिस आणि विद्यमान आमदार रुडॉल्फ फर्नांडिस दोघेही भाजपवासी झाले आहेत. भाजपने या मतदारसंघात आपले वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे; परंतु त्यांना यश मिळालेले नाही. मोठ्या संख्येत परप्रांतीय आणि अल्पसंख्याक मतदार असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ अवघड ठरणार आहे.

सांताक्रुझमध्ये रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाने (आरजी) प्रचारात आघाडी घेतली असून पक्षाचे उमेदवार मनोद ऊर्फ तुकाराम परब यांचा बऱ्यापैकी प्रचार झाला आहे. तसेच पक्षाच्या बैठकादेखील कार्यकर्त्यांच्या घरी घेतल्या जात आहेत.

त्याशिवाय सोशल मीडियाद्वारेदेखील पक्षाने इतर पक्षांवर आघाडी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजपची यंत्रणाही बऱ्यापैकी सक्रिय झाल्याची दिसते. पक्षाचे उमेदवार केंद्रीय मंत्री तथा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक हे सहाव्या वेळी निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) हे दोघेही इंडिया गट म्हणून निवडणूक लढत असले, तरी त्यांचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे प्रचारलाही आरंभ केलेला नाही. काँग्रेस कोणता उमेदवार देणार, यावर राजकीय गणित अवलंबून असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT