Beginning of the process of disposal of illegal boats Dainik Gomantak
गोवा

बेकायदेशीर होड्यांची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

सावर्डे येथील जुआरी नदीच्या काठी मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या होडी आणि रेती काढण्यासाठी लागणारे साहित्य स्क्रॅप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

दैनिक गोमन्तक

कुडचडे : जुआरी नदी, कुशावती आणी इतर ठिकाणी बेकायदेशीर रित्या रेती काढणाऱ्या होडी संबंधित खात्याने जप्त केल्या होत्या त्यांची विल्हेवाट लावण्याचा आदेश न्यायालयाने दिल्या नंतर आज सावर्डे येथील जुआरी नदीच्या काठी मोठ्या प्रमाणात जप्त केलेल्या होडी आणि रेती काढण्यासाठी लागणारे साहित्य स्क्रॅप करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

या सर्व होडी स्क्रॅप करण्यासाठी एकूण छत्तीस लाख रूपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार होड्या स्क्रॅप करण्याच्या कामाला लागलीच सुरुवात करण्यात आली आहे.

वेगवेगळ्या भागात बेकायदेशीर रेती काढताना संबंधित खात्याने होड्या ताब्यात घेण्यात आल्या होत्या. या व्यवसाया विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती तिची सुनावणी करताना न्यायालयाने बेकायदेशीर व्यवसायात गुंतलेल्या होड्या स्क्रॅप करण्याचा आदेश दिला होता.

व्यवसाय जरी बेकायदेशीर असला तरी अनेक युवकांनी बेकारीत आपला पैसा या व्यवसायात गुंतवणूक केला होता. अनेकांनी कर्ज घेऊन या व्यवसायात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार बेरोजगार युवकांची स्वप्ने अर्धवट राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT