Beggars in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील भिकाऱ्यांच्या प्रश्नावर स्थानिक आक्रमक

म्हापशातील रहिवाशांनी घेतली उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट; गोवा कॅन संस्थेची तोडगा काढण्याची मागणी

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सध्या भिकाऱ्यांचा सुळसुळाट वाढल्याचं चित्र आहे. अशातच यातील लहान मुलं व्यापारी, प्रवासी, ग्राहकांना पैसे मागून सतावत असल्याची तक्रारही सातत्याने होताना दिसत आहे. पोलिसांकडूनही आतापर्यंत या समस्येवर तोडगा काढण्यात कोणतंही यश आलेलं नाही. त्यामुळे आता म्हापशातील रहिवाशांनीच पुढाकार घेत उत्तर गोवा उपजिल्हाधिकाऱ्यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. (Beggars in Goa)

गोवा कॅनने याप्रकरणी कृती आराखडा तयार करुन भिकाऱ्यांचा बंदोबस्त करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. भिकाऱ्यांमुळे म्हापसा बाजारपेठेतील व्यापारीच नाही तर ग्राहकही त्रस्त झाल्याचं दिसून येत आहे. गोवा दमण आणि दीव भिकारी प्रतिबंधक कायदा 1972 ची अमलबजावणी करण्याची मागणी गोवा कॅनचे गुरुदास नाईक यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात एक संयुक्त बैठक घेऊन सर्व यंत्रणांना ज्यात पोलीस, वाहतूक पोलीस, महापालिका, महिला आणि बालविकास यासारख्या संस्थांनाही सोबत घेत कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक घेण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती नगरविकास खात्याच्या सचिवांनाही पाठवण्यात आल्या असून विविध खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लक्षही गोवा कॅनने गोव्यातील भिकाऱ्यांच्या याप्रकरणात वेधलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

Afghanistan Drone Attack: सीमेवरील गोळीबाराचा अफगाणिस्ताननं घेतला बदला! अफगाण वायूसेनेचा पाकिस्तानात घुसून मोठा हवाई हल्ला; दहशतवादी तळ उद्ध्वस्त

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

Goa Weather: 4 दिवसांत पाऊस न पडल्‍यास धरणांची अवस्‍था 2023 सारखी! मान्‍सूनने पाठ फिरवल्‍याने जलसाठ्यात मोठी घट

Goa Water Crisis: धरणे आटली, चिंता दाटली..! पाऊस लांबल्‍यास 'ओपा'ला बसणार मोठा फटका; गोव्यातील जलसंकट गडद

SCROLL FOR NEXT