Government Scheme Dainik Gomantak
गोवा

Government Scheme: सरकारच्या योजनांचा लाभ घेऊन स्वयंपूर्ण बना; श्याम सावंत यांचे आवाहन

म्हाऊस पंचायतीत ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ सुविधा उपलब्ध

दैनिक गोमन्तक

नागरिकांपर्यंत सरकारच्या विविध पोहोचवून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध योजना आखत आहे. त्या योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांना व्हावा यासाठी वेळोवेळी कार्यशाळा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी विविध खात्यांचे अधिकारी पंचायत पातळीवर आणले जातात. त्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन आत्मनिर्भर व स्वयंपूर्ण बनावे, असे आवाहन म्हाऊस पंचायतीचे स्वयंपूर्ण मित्र श्याम सावंत यांनी केले.

शनिवारी म्हाऊस पंचायतीत ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. म्हाऊस पंचायत आणि आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवातर्फे म्हाऊस येथील सुभद्रा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सरकारच्या विविध योजनांच्या शिबिरात श्याम सावंत बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर पंचायत सचिव संदीप हल्याळी, पंच सुलभा देसाई, गुरुदास गावस, कांता गावस, प्रीती गावकर, सयाजी सावंत आदींची उपस्थिती होती.

सरकारच्या अनेक योजना असतात. त्या प्रत्येकापर्यंत पोहोचविल्या पाहिजेत. आमचा सदैव प्रयत्न असतो की नागिरकांना सर्व योजनांचा चांगल्याप्रकारे फायदा मिळावा. त्यासाठी पंचायत पातळीवर वेळोवेळी सहकार्य केले जाते. या योजनांचा फायदा घेऊन प्रत्येक घटकांनी स्वयंपूर्ण व्हावे.

- श्याम सावंत, स्वयंपूर्ण मित्र, म्हाऊस पंचायत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT