Goa Borim Dainik Gomantak
गोवा

Borim: बोरी येथे दसरा सीमोल्लंघन परिसरातील सौंदर्यीकरण कामास प्रारंभ

Borim: कलमामळच्या या प्रकल्पामुळे देवीची पालखी, कौल व तरंगाचा कार्यक्रम आता अधिक चांगल्या तऱ्हेने होणार आहे

गोमन्तक डिजिटल टीम

बोरी: जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर यांनी मिळालेल्या निधीचा वापर मतदारसंघात सार्वजनिक ठिकाणी लोकोपयोगी प्रकल्प उभारण्यासाठी केला. हे कार्य त्यांनी असेच सुरू ठेवावे आणि लोकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, असे प्रतिपादन बोरीच्या श्री नवदुर्गा संस्थानचे अध्यक्ष श्‍याम प्रभुदेसाई यांनी केले.

जिल्हा पंचायतीमार्फत सुमारे १३ लाख रुपये खर्चाची योजना आखून कलमामळ-बोरी या श्री नवदुर्गा देवीच्या दसरा सीमोल्लंघन कौलप्रसाद ठिकाणाच्या सौंदर्यीकरणास प्रारंभ करताना ते बोलत होते. याप्रसंगी बोरीचे सरपंच सतीश नाईक, श्री नवदुर्गादेवीचे अर्चक दत्तात्रय उर्फ बाबू देवारी, पुरुषोत्तम प्रभुदेसाई आदी मान्यवर उपस्‍थित होते.

नाईक बोरकर म्‍हणाले की, बोरी आणि बेतोडा निरंकाल गावात जि.पं.मार्फत अनेक लोकोपयोगी प्रकल्प उभारले आहेत. कलमामळच्या या प्रकल्पामुळे देवीची पालखी, कौल व तरंगाचा कार्यक्रम आता अधिक चांगल्या तऱ्हेने होणार आहे. श्‍याम प्रभुदेसाई आणि सरपंच सतीश नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन करून आणि श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pilots Dope Test: वैमानिकांची आता वर्षातून एकदा होणार 'डोप टेस्ट'! DGCA लागू करणार नवा नियम; जाणून घ्या काय आहे नवा प्लॅन?

Headland Sada: पोस्ट खात्याची सदनिका बनली शेळ्यांचा निवारा! वर्षानुवर्षे दुर्लक्षामुळे सरकारी इमारत जीर्ण; भंगारवाल्याचाही शिरकाव

Lucky Zodiac Signs 2026: बुधाचे मघा नक्षत्रात गोचर! 'या' लकी राशींवर होणार पैशांचा पाऊस, रक्षाबंधनापर्यंत जॅकपॉट

Colvale Electricity Bills: कोलवाळात वीज बिले दुप्पट-तिप्पट! ग्राहकांना 17 हजारांपर्यंत बिलांचा फटका, फेरपडताळणीची मागणी

Tarun Tejpal Case: तरुण तेजपालला सुप्रीम कोर्टाचा दणका! अधिक वेळ देण्याची याचिका फेटाळली; दोन आठवड्यांत आत्मसमर्पणाचे निर्देश

SCROLL FOR NEXT