Bear Attacks Dainik Gomantak
गोवा

Bear Attacks:अळंबी आणण्यासाठी गेलेल्या युवकावर अस्वलाचा हल्ला, धारगे - तांबडीसुर्ला येथील घटना

Mahavir sanctuary incident: धारगे-तांबडीसुर्ला येथील भाई गावकर हा युवक अळंबी आणण्यासाठी महावीर अभयारण्यात गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला.

Sameer Amunekar

फोंडा: धारगे-तांबडीसुर्ला येथील भाई गावकर हा युवक अळंबी आणण्यासाठी महावीर अभयारण्यात गेला असता त्याच्यावर अस्वलाने हल्ला केला. आक्रमक झालेल्या अस्वलाच्या तावडीतून कसेबसे सुटका करून त्याने आपले घर गाठले.

उपचारासाठी त्याला प्रथम पिळये येथील आरोग्य केंद्रात दाखल केले होते. मात्र, अस्वलाने केलेल्या जोरदार हल्ल्यामुळे भाई याच्या शरीरावर खोलवर जखमा झाल्याने त्याला गोमेकॉत दाखल केले आहे. जंगलात जाणे धोक्याचे असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन वन खात्याने केली आहे.

तीन पिलांसोबत फिरते मादी

स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मादी अस्वलाबरोबर तिची तीन छोटी पिल्ले होती. भाई गावकर हा जेव्हा जंगलात फिरत होता, त्यावेळी अचानक त्याच्यासमोर ही अस्वले आली आणि मादी अस्वलाने जोरदार हल्ला केला, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

खरी कुजबुज: ‘वाळवी’ने पेटवलेला वणवा

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

SCROLL FOR NEXT