Goa Beach Coastal Erosion Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्यातील किनारे संकटात! धूप होण्याचे वाढले प्रमाण; पर्यटनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता

Goa Beach Coastal Erosion: चेन्नई येथील राष्ट्रीय शाश्‍‍वत किनारपट्टी व्यवस्थापन केंद्राच्या वैज्ञानिक डॉ. एस. राजकुमारी यांनी गोवा सरकारच्या विनंतीवरून हा अहवाल तयार केला आहे.

Sameer Panditrao

पणजी: उत्तर गोव्यात समुद्रकिनाऱ्यांची धूप होण्याची टक्केवारी २०१० ते २०२४ या कालावधीत २२ टक्‍क्यांवरून २७ टक्क्यांपर्यंत तर दक्षिण गोव्यात २३ टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. चेन्नई येथील राष्ट्रीय शाश्‍‍वत किनारपट्टी व्यवस्थापन केंद्राच्या वैज्ञानिक डॉ. एस. राजकुमारी यांनी गोवा सरकारच्या विनंतीवरून हा अहवाल तयार केला आहे.

सरकारच्या पर्यावरण व हवामानबदल विभागाच्या आधिपत्याखाली किनारपट्टी रक्षणासाठी ‘वाळू मोटर तंत्रज्ञान’ या पथदर्शी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी स्थापन केलेल्या नोडल समितीची पहिली बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. या बैठकीत राज्यातील किनारपट्टीची स्थिती, झपाट्याने बदलणारी तिची रचनात्मक स्‍थिती आणि संभाव्य संरक्षण उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.

डॉ. एस. राजकुमारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, १९८३ ते २०२४ या काळात गोव्याच्या किनारपट्टीवर झपाट्याने झालेले बदल चिंताजनक आहेत. भूक्षय आणि गाळ साचणे या दोन्ही प्रक्रिया वाढत आहेत. मात्र भूक्षयाचा वेग अधिक आहे. विशेष म्हणजे, उत्तर गोव्यात भूक्षयाची तीव्रता जास्त असली तरी लांबीच्या दृष्टीने दक्षिण गोव्यातील किनारे अधिक प्रभावित झालेले आहेत.

या बैठकीचा मुख्य गाभा हा होता की, भूक्षय ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया नसून मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे. त्यामुळे तात्काळ निर्णय घेण्याऐवजी दीर्घकालीन शाश्‍‍वत दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.भूक्षयग्रस्त भागांचे तांत्रिक विश्‍‍लेषण, आर्थिक मूल्य, स्थानिक भूमिती आणि सामाजिक घटक लक्षात घेऊन किनारपट्टी रक्षणासाठी योग्य उपाययोजना आखण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

पर्यटनाचा विचार

गोव्याचे पर्यटन समुद्रकिनाऱ्यांवर आधारित असल्याने आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या किनारपट्टीवर तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे. भूक्षय रोखण्यासाठी सौम्य आणि कठोर प्रकारांतील उपाययोजना मांडण्यात आल्या. विशेषत: ‘सॅण्ड मोटोर’ ही नेदरलँडमध्ये यशस्वी ठरलेली पद्धत गोव्यासाठी उपयुक्त ठरू शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

प्रत्यक्ष निरीक्षण आणि तांत्रिक अभ्यास विविध संस्थांनी भूक्षय व गाळ साचणे यावर वेगवेगळे निरीक्षण नोंदविले आहे. एनआयओ, इस्त्रो, नेसिस, डेल्टारस यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्‍थांच्‍या तज्‍ज्ञांनी आपापली मते मांडताना गोवा किनाऱ्याचा सुमारे ५० टक्के भाग खडकाळ असल्याने मोजमाप व विश्‍‍लेषण करताना समान संदर्भ बिंदू वापरण्याची गरज अधोरेखित केली आहे.

संवेदनशील, इतर क्षेत्रांसाठी कृती योजना

‘एनसीएससीएम’ने सतत भूक्षय/गाळसाचणे भागांचा केएमएल फाईल स्वरूपातील नकाशा तयार करून तो इतर संस्थांना पाठवणे.

‘एनसीसीआर’ आणि ‘एनआयओ’ यांना त्यांच्या अभ्यासानुसार भूक्षयग्रस्त क्षेत्रांची यादी सादर करणे.

जलसंपदा खात्याने दक्षिण गोव्यातील वेळसाव ते मोबोर या किनाऱ्यांवर लक्ष केंद्रित करणे.

संबंधित सर्व यंत्रणांनी तालुका पातळीवर नकाशे व माहिती तयार करणे.

पर्यावरणाचे रक्षण म्हणजे विकासाचे बळकटीकरण.

मोरजी, हणजूण, कोलवा ते केळशी आणि पाळोळे

ही ठिकाणे संभाव्य ठिकाणे अभ्यासासाठी सुचवण्यात आली. या ठिकाणी भूक्षय मोठ्या प्रमाणावर आढळतो किंवा पर्यावरणीय संवेदनशीलता जास्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: 58 वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये 'चक दे इंडिया', इंग्रजांना 336 धावांनी चारली पराभवाची धूळ; मालिकेत बरोबरी

Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Honnali Nawab: मुंबईहून इंग्रजी सैन्य कुर्गच्या वाटेने श्रीरंगपट्टणकडे निघाले, शौर्यगाथा होन्नालीच्या नवाबाची

New Cricket League: क्रिडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी! भारतात सुरू होणार आणखी एक टी-20 लीग, 6 संघांमध्ये रंगणार स्पर्धा

साखळीत मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, केला पांडुरंगाला अभिषेक; Watch Video

SCROLL FOR NEXT