Arrested Women Dainik Gomantak
गोवा

Goa Crime : पर्यटकांनो गोव्यात येताय तर सावधान! एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली लुटीच्या प्रकरणांमध्ये वाढ

आंध्रप्रदेशातील पर्यटकाला एस्कॉर्ट सेवेच्या नावाखाली घातला होता गंडा

गोमन्तक डिजिटल टीम

एस्कॉर्ट सेवा देण्याच्या नावाखाली आंध्रप्रदेशातील पर्यटकाला 40 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांंपूर्वी उघडकीस आला होता. याप्रकरणी पणजी पोलिसांनी एका महिलेला अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव रोशनी कवास (27, बेती, बार्देश) असे आहे. दरम्यान, संशयित रोशनी कवास हिला एस्कॉर्ट सेवा प्रकरणी आणखीन एका गुन्ह्यात आज पुन्हा अटक करण्यात आली आहे. म्हापसा पोलिसांनी ही अटक केली आहे.

पहिल्या प्रकरणामध्ये एस्कॉर्ट सेवा देण्याच्या नावाखाली आंध्रप्रदेशातील नाजुरुल्ला शेख या पर्यटकाला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. बुधवारी मध्यरात्री १२.३० ते १.३० वाजता तक्रारदार नाजुरुल्ला शेख याला पणजीतील एका खोलीत बंद करून त्याच्याकडून १५ हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच त्याला मारहाण करून त्याच्याकडून २५ हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला आणि त्याला धमकी देऊन आणखीन २० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याची दखल घेऊन पणजी पोलीस निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयुर पणशीकर यांनी अज्ञात महिलेविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३२३, ५०४, ५०६(), ३९२, ३४२ आणि आरडब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली. संबंधित महिला बेती येथील असल्याची माहिती मिळताच बेती येथुन महिलेला ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, आता दुसऱ्या एस्कॉर्टच्या प्रकरणामध्ये संशयित रोशनी कवास या महिलेने हैदराबाद तेलंगणा येथील पर्यटकांना धमकी देऊन 20 हजार रुपये रोख व मोबाईल फोन हिसकावून घेतल्या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Month: क्षणात सर, क्षणात सोनेरी ऊन अन् चहूकडे हिरवाईचा साज! निसर्गसौंदर्य आणि सणांची पवित्र अनुभूती देणारा श्रावण पुन्हा अवतरला

Budh Mangal Yog: स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला बुध-मंगळाचा ‘दशांक योग’! 5 राशींच्या आयुष्यात येणार सुखाचे दिवस; अफाट धनलाभासोबत सुरु होणार सुवर्णकाळ

Cyber Crime: APK File डाउनलोड करणं पडलं महागात! आके येथील महिलेच्या बँक खात्यातून 6.5 लाख उकळले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Crime News: आई आणि लहान भावाचा 17 वर्षीय अर्जुननं काढला काटा, चॅटजीपीटीला विचारायचा ठार मारण्याचा प्लॅन; अखेर 'सायको किलर' पोलिसांच्या ताब्यात VIDEO

Bison In Goa: नार्वेत गव्यांचा धुमाकूळ! भाजी पिकाची नासधूस, बंदोबस्‍ताची मागणी; ऐन पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT